अमरावती : प्रेमप्रकरणातून एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने विद्यार्थीनीला चाकूने भोसकले आणि त्यानंतर तोच चाकू स्वतःच्या पोटात भोसकला. यामध्ये विद्यार्थीनी जागीच ठार झाली आहे, तर हल्लेखोर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धामणगावनजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहरात प्रेम प्रकरणातून 12 वीमध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीला एका तरुणाने गार्डनमध्ये नेले. तिथे त्याने तिच्या पोटात चाकू भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर त्या तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकला. प्रतिभा दिलीप कोंबे असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.


प्रतिभा ही जुने धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगावमधील सेफला हायस्कूलमध्ये इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकत आहे. आज (06 जानेवारी) सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास ती महाविद्यालयात जात होती. त्यावेळी सागर तितुरमारे हा तरुण तिला वाटेत भेटला. त्याने प्रतिभाला तिला गार्डमध्ये नेले, आणि तिथेच तिच्या पोटावर चाकूने सपासप वार केले आणि भोसकले, त्यात प्रतिभाचा जागीच मृत्यू झाला.


चाकू हल्याल्यानंतर प्रतिभा जमिनीवर कोसळली. त्यानंतर तोच चाकू सागरने स्वतःच्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात सागर गंभीर जखमी झाला. त्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी सागरला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सागरवर सध्या उपचार सुरु आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


व्हिडीओ पाहा




CCTV VIDEO : पेट्रोलवरुन वाद, तरुणावर चाकूने हल्ला | नागपूर | एबीपी माझा