Happy New Year 2022 : आज पासून 2022 या नव्या वर्षाची सुरूवात झाली आहे. काल सरत्या वर्षाला 'बाय-बाय' म्हणतं अनेकांनी नव वर्षाचं स्वागत केलं. पण 1 जानेवारीलाच नवं वर्ष का साजरं केलं जातं? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जाणून घेऊयात न्यू ईअरचा इतिहास...


1 जानेवारीला नव्या वर्षाची सुरूवात करण्याची पद्धत 15 ऑक्टोबर 1582 पासून सुरू झाली. त्या आधी काही दिवस 25 मार्चला तर नंतर 25 डिसेंबरला नवं वर्षाची सुरूवात केली जात होती. रोमचे राजा नूमा पोंपिलस यांनी रोमन कॅलेंडरमध्ये बदल केला. त्यांनी जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना केला. त्याआधी लोक मार्च महिना हा वर्षाचा पहिला महिना म्हणून साजरा करत होते. मार्च या महिन्याचे नाव मार्स (mars)या ग्रहावरून ठेवण्यात आले आहे. मार्स म्हणजेच मंगळ ग्रहाला रोममधील लोक युद्धाचा देव मानत असत.


असे तयार झाले कॅलेंडर
सर्वात पहिले तयार झालेल्या कॅलेंडरमध्ये 10 महिने होते. तसेच या कॅलेंडरमध्ये 310 दिवस असून 8 दिवसांचा एक आठवडा या कॅलेंडरमध्ये होता.  रोमन शासक जूलियस सीजर यांनी या कॅलेंडरमध्ये बदल केले. त्यांनी कॅलेंडरची सुरूवात 1 जानेवारी या तारखेपासून केली. नवे कॅलेंडर तयार करण्यासाठी जूलियस सीजर यांनी काही खगोलशास्त्रज्ञांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की पृथ्वी 365 दिवस आणि सहा तासांमध्ये सूर्याला एक फेरी मारतो. त्यामुळे जूलियसने 365 दिवसाचे एक वर्ष असणारे कॅलेंडर तयार केले. 


पोप ग्रेगरी यांनी  1582 मध्ये  जूलियस सीजरने तयार केलेल्या कॅलेंडरमधील लीप वर्षांची चूक शोधली. त्याकाळचे प्रसिद्ध धर्म गुरू  सेंट बीड यांनी सांगितले की, एका वर्षात 365 दिवस, 5 तास आणि 46 सेकंद असतात. त्यानंतर रोमन कॅलेंडरमध्ये काही बदल करण्यात आले. तेव्हापासून नवं वर्ष 1 जानेवारीपासून साजरं केले जाऊ लागलं.


भारतात 1 जानेवारी बरोबरच या दिवसांनाही साजरा केला जातो न्यू ईयर 
भारतात  1 जानेवारी बरोबरच अनेक वेगळा न्यू ईअर साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी नव वर्ष साजरे केले जाते. हवामानानूसार, ऋतूनुसार तसेच लूनार आणि  राष्ट्रीय (सौर) कॅलेंडरनुसार भारतात वेगवेगळ्या दिवसांना नववर्ष लोक साजरे करतात. बैसाखीच्या दिवशी भारतातील उत्तर आणि मध्य भागात नववर्ष साजरे केले जाते. तर लूनार कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात उगादी आणि  महाराष्ट्रात  गुढी पाडवा हे सण साजरे करून नव वर्षाचे स्वागत केले जाते. 


इतर बातम्या :


Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत