Malaika Arora And Arjun Kapoor : अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात. दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. नुकताच मलायकानं खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला मलायकाने दिलेल्या कॅप्शननं सर्वांचे लक्ष वेधले. 


मलायकाची पोस्ट 
अर्जुनसोबतचा फोटो शेअर करून मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मला तुझी आठवण येत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा' मलायकाने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मलायका आणि अर्जुनचे फॅन्स या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 






काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती. अर्जुनसोबत त्याच्या बहिणींना म्हणजेच रिया कपूर आणि अंशुला कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली.  मलायरका आणि अर्जुनच्या अफेअरबाबत सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरू असते. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'


संबंधित बातम्या


Malaika Arora Arjun Kapoor Love : 12 वर्षांनी मोठ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपमुळे अर्जुन ट्रोल, ट्रोलर्सनाला दिलं सडेतोड उत्तर


Malaika Arora : अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर अर्जुनला डेट करण्याबाबत मलायका म्हणाली...