White Toilet Paper : तुमचं घर असो, मॉल असो किंवा एअरपोर्ट, वॉशरूममध्ये नेहमीच एक गोष्ट कॉमन असते आणि ती म्हणजे टॉयलेट पेपर (Toilet Paper). ज्या ज्या ठिकाणी वॉशरूम असतं त्या ठिकाणी हमखास या टॉयलेट पेपरचा वापर केला जातो. इतकंच नाही तर या टॉयलेट पेपरचा रंगसुद्धा एकच पाहायला मिळतो तो म्हणजे पांढरा. तुम्ही कधी हिरवा, लाल, निळा किंवा रंगीत टॉयलेट पेपर क्वचितच पाहिला असेल. मात्र, अनेकदा पांढऱ्या रंगाचेच टॉयलेट पेपर वापरले जातात. अशा वेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सगळ्याच ठिकाणी पांढऱ्या रंगाचा पेपर का वापरला जातो? खरंतर पांढरा टॉयलेट पेपर वापरण्यामागे अनेक कारणं आहेत. ही कारणं नेमकी कोणती ते जाणून घ्या.   


टॉयलेट पेपर कसा बनवला जातो?


टॉयलेट पेपर सेल्युलोज फायबरपासून बनवला जातो. ते थेट झाडापासून तयार केले जाते किंवा कागदपत्रांचाच पुनर्वापर करून तयार केले जातात. या फायबरपासून सर्वात आधी एक कागद तयार केला जातो आणि नंतर तो डिझाइनसह कापून बाजारात विकला जातो.


टॉयलेट पेपर पांढरा का असतो?


अनेक रिपोर्ट्समधून टॉयलेट पेपर पांढरा होण्यामागची कारणे सांगण्यात आली आहेत. टॉयलेट पेपर पांढरा होण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे ते बनवल्यावर ब्लीच केले जाते. त्यामुळे त्याचा रंग पांढरा होतो. जर या पेपरमध्ये रंग भरायचा असेल तर रंगवावा लागतो. रंगासाठी कंपनीची किंमत खूप जास्त असू शकते, म्हणून ते बाजारात पांढऱ्या रंगात विकले जातात.


केवळ खर्च वाचवण्यासाठी कंपन्या पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर ठेवतात असं नाही. रंगीत टॉयलेट पेपर आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो आणि डॉक्टर देखील पांढरा टॉयलेट पेपर वापरण्याचा सल्ला देतात. याशिवाय पांढरा कागद हा पर्यावरणपूरक मानला जातो आणि तो विघटन करणेही सोपे असते. कंपन्या हायड्रोजन पेरॉक्साइडने ब्लीच करतात, ज्यामुळे ते पांढरे आणि खूप मऊ असते. पर्यावरणासाठीही हा पेपर खूप फायदेशीर आहे. 


पूर्वी रंगीत टॉयलेट पेपर असायचा


पन्नाशीच्या दशकात रंगीत टॉयलेट पेपर वापरला जायचा असे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. हॉटेलमधील प्लेट्स, हॉटेलची थीम, टॉवेल इत्यादींचा रंग लक्षात घेऊन त्यांचा रंग ठरवण्यात आला. नंतर हळूहळू त्यांचा ट्रेंड संपला आणि आता फक्त पांढरा टॉयलेट पेपर वापरला जातो.


महत्त्वाच्या बातम्या : 


ATM PIN : फक्त 4 अंकीच नाही तर 6 अंकीही असतो पिन; कोणता पिन अधिक सुरक्षित?