Weight Loss Vegetables : वजन कमी (Weight Loss) करण्यात किंवा वाढवण्यात तुमचा आहार सर्वात मोठी भूमिका बजावतो. तुम्ही कोणते धान्य खाता, कोणती फळे निवडता आणि कोणत्या भाज्या खाता? याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कमी कॅलरी असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. स्टार्च नसलेल्या भाज्या खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. भाज्यांमध्ये कमी कॅलरी अन्न, भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. जर तुम्ही जास्त भाज्या खाल्ल्या तर त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज येत नाहीत, ज्यामुळे तुमचा फिटनेस टिकून राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांना आहारात समावेश केला पाहिजे. 


पालक : पालक खाल्ल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पालक ही पौष्टिक भाजी मानली जाते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. पालक सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध आहे. पालक लोह, जीवनसत्त्वे ए, सी, के, मॅग्नेशियम आणि मॅंगनीजचा स्रोत आहे. पालक जरूर खा. 


गाजर : गाजराचा हंगाम हिवाळ्यात असला तरी आजकाल तुम्हाला संपूर्ण हंगामात बहुतांश भाज्या सहज मिळू शकतात. तुमच्या आहारात गाजराचा समावेश जरूर करावा. गाजरांमध्ये कॅलरीज कमी आणि पोषक तत्वांनी भरलेले असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. गाजर हे व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. 


ब्रोकोली : लो कार्ब भाजीमध्ये ब्रोकोलीचा समावेश होतो. संपूर्ण हंगामात तुम्हाला ब्रोकोली सहज मिळू शकते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी त्यांचा आहारात समावेश करावा. ब्रोकोली जीवनसत्त्वे C आणि K चा चांगला स्रोत आहे. त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप कमी असते. तुम्ही ते सलाड, सूप किंवा भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता. 


बीट : लठ्ठपणा कमी करण्यासाठी बीटरूटचा आहारात सलाद किंवा ज्यूसच्या स्वरूपात नक्कीच समावेश करा. बीटरूट ही कमी उष्मांक आणि चरबीमुक्त भाजी आहे. हा फायबर आणि जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. बीटरूट खाल्ल्याने लोहाची कमतरता पूर्ण होते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :