Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करताना लोक खूप फिकट पदार्थ खाऊ लागतात. याचे कारण असे की, सर्व चवदार पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत. मात्र, तसे नाही. असे अनेक प्रकारचे पदार्थ आहेत जे आरोग्यदायी तसेच चवदार असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या आहाराचे अनुसरण करत असाल, तर चव बदलण्यासाठी किंवा तुम्हाला काही चविष्ट खाद्यपदार्थांची लालसा असेल तर तुम्ही चाट बनवू शकता. या चाटमुळे तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते. या चाटमध्ये प्रथिने आणि फायबर असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणती चवदार आणि हेल्दी चाट खाऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मिक्स स्प्राउट्स आणि कॉर्न चाट- स्प्राउट्स वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. तुम्हा सर्वांना कडधान्याचे फायदे माहीत असतीलच. हे प्रथिने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या डाळींपासून तयार केले जाते. यामध्ये असलेले कॉर्न तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी हा चाट फायदेशीर आहे. हा चाट तयार करण्यासाठी मसूर, कॉर्न, टोमॅटो, कांदा आणि काही हलके मसाले मीठ, लिंबू, मिरपूड घालून मिक्स करा. तुम्ही हे नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅकमध्ये खाऊ शकता.
अंड्यापासून बनवलेला अंडा चाट - अंडी हा फिटनेसचा महत्तपूर्ण पदार्थ मानला जातो. कारण त्यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात आणि वजन कमी करण्यापासून तुम्हाला दिवसभर ऊर्जा देण्यास अंड्याची मदत होते. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, अंडी हे सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि लोह असलेले पोषणाचे भांडार आहे. चाट बनवण्यासाठी तुम्ही उकडलेले अंडे घ्या आणि त्यात टोमॅटो केचप, चिंचेची चटणी आणि लिंबाचा रस मिसळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- उकडलेले सॅलड खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होईल, शरीरालाही मिळतील अनेक फायदे
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha