मुंबई: अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मलिकांची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. 


या प्रकरणी न्यायालयात दोन्ही बाजूंकडून काय युक्तीवाद करण्यात आला हे जाणून घेऊया. 


नबाब मलिकांकडून युक्तीवाद काय?



  • सकाळीच ईडी अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. त्यांनी मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणलं.

  • आपल्याला जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी कोणताही समन्स न देता आपल्याला या ठिकाणी आणण्यात आलं आणि सही घेण्यात आली. 

  • कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची  माहितीही दिली नाही.

  • ईडीची कारवाई करण्यापूर्वी किंवा कोणतीही प्रतिबंधक कारवाई करण्यापूर्वी ईडीने आपल्याला कोणतीही माहिती दिली नाही. 

  • ज्या सलीम पटेलचा उल्लेख ईडीकडून केला जातोय तो दुसराच व्यक्ती आहे. मलिकांनी जमीन खरेदी केली तो सलीम पटेल हा हसिना पारकरचा ड्रायव्हर नसून दुसराच व्यक्ती आहे.  



ईडीचा युक्तीवाद



  • दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. दाऊदची अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • हसिना पारकर हा दाऊदची भारतातील हस्तक असून तिच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करतोय. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा केली गेली आहे. 

  • हसिना पारकर आणि नवाब मलिक यांचा आर्थिक संबंध आहे. 

  • नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित संपत्ती नवाब मलिकांनी खरेदी केली.

  • कुर्ला येथील संपत्ती ही मुळाच डी गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. तिच संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे

  • दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे.

  • हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली.

  • हे प्रकरण मनी लॉंड्रिंगशी संबंधित असल्याने नवाब मलिकांची 14 दिवसांची कस्टडी मिळावी, त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करता येईल.


संबंधित बातम्या: