Surat Factory Fire : सुरतच्या कडोदरामध्ये पॅकेजिंग फॅक्टरीमध्ये अग्नितांडव. आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून 125 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. अग्नीशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असून बचावकार्य सुरु आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील कडोदरात वरोली येथे आज सकाळी एका पॅकेजिंग फॅक्ट्रिमध्ये आग लागल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 125 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. सुरतमधील पलसाना तालुक्यातील वरेली गावात तुलसी पार्क औद्योगिक इस्टेटमध्ये भीषण आग लागली. ही कंपनी साडी पॅकिंग करण्यासाठी बॅग आणि मास्क तयार करायची. जिल्हा आणि सूरत शहरातून दहापेक्षा अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
एबीपी अस्मिताशी बोलताना जिल्ह्याधिकाऱ्यांनी माहिती दिली की, आग सकाळी साडेचार वाजता लागली आणि आग खूप भीषण होती. आगीची माहिती मिळातच अग्निशमन तात्काळ घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत दोन हायड्रोलिक क्रेनच्या मदतीनं 124 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं बचाव कार्य सुरु केल्यामुळं अनेकांचे प्राण वाचले. जखमींना स्मीमेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :