Weight Loss Tips : वजन वाढणे ही आज मोठी समस्या बनत चालली आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिममध्ये तासनतास घाम गाळतात. मात्र, महिलांना जिमसाठी वेळ काढणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही घरी बसून देखील वजन कमी करू शकता. आज आम्ही काही तुमच्यासाठी सोपे व्यायाम घेऊन आलो आहोत, जे दररोज थोडा वेळ काढून वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
जॉगिंग आणि रनिंग
वजन कमी करण्यासाठी जॉगिंग आणि रनिंग हा खूप चांगला मार्ग आहे. हे खूप चांगले व्यायाम आहेत. स्त्रिया त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये या व्यायामाचा समावेश करून वजन कमी करू शकतात. या व्यायामामुळे व्हिसेरल फॅट कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होते. हे तुम्ही कुठेही सहज करू शकता. यामुळे हृदयाचे आजारही दूर होतात.
स्क्वॉट्स
स्क्वॉट्समुळे पाय मजबूत होण्याबरोबरच कंबर आणि पोटाभोवतीची चरबीही कमी होते. यामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो. तसेच, स्क्वॉट्स सुरू करण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर तुम्ही स्क्वॉट्स टाळावेत. या व्यायामामुळे वजन झपाट्याने कमी होते. घरात राहून महिला हे सहज करू शकतात.
ब्रिज पोझ
कंबर आणि पाठीशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी ब्रिज पोज योग विशेषतः फायदेशीर आहे. असे रोज केल्याने पाठ, गोटे, पाय आणि घोट्या मजबूत होतात. यासोबतच छाती, हृदय आणि नितंबाचे स्नायू निरोगी राहतात. या योगामुळे वजन कमी होण्यास मदत होत नाही. महिलांनी दररोज हा योग करण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. यामुळे फॅट लवकर निघून जाते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.