Health Tips : फळांशिवाय (Fruits) आपला आहार पूर्ण होत नाही. निरोगी आणि हेल्दी राहण्यााठी तर फळं आवर्जून खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फळांमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहेत. पण, फळं खाताना कोणत्या फळाची साल खावी आणि कोणत्या फळाची साल खाऊ नये? याबाबत अनेकदा आपला गोंधळ होतो. भेसळ आणि रसायनांमुळे लोक फळांची साल काढून खातात.


याच संदर्भात अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंको रोहतगी सांगतात की, फळं नीट धुतल्यानंतर सालीसह खाणं सुरक्षित मानले जाते. यातून शरीराला आवश्यक असलेली पोषण तत्त्व, फायबर आणि जीवनसत्त्व मिळतात. सफरचंद, चिकू आणि द्राक्षे फक्त त्यांच्या सालींबरोबर खावीत. मात्र, काही लोक आपली पचनसंस्था लक्षात घेऊन फळं सोलल्यानंतरच खातात.


कोणती फळं सालींसोबत खावीत


डॉ. प्रियंको रोहतगी सांगतात की, फळांची सालं घालून खाण्यात कोणताही धोका नसतो. पण, ती आधी नीट धुवावीत. जेणेकरून हानिकारक रसायने काढून टाकली जातात. कोणती फळं सालींबरोबर खाल्ली जाऊ शकतात या संदर्भात जाणून घेऊयात. 


सफरचंद : सफरचंदाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. सफरचंद खाताना नेहमी ती सालीसकट आणि स्वच्छ धुवून खावीत. 


आलू बुखारा : लाल रंगाचा दिसणारा आलू बुखारा चवीला आंबट आणि गोड लागतो. हे फळ तुम्ही सालीबरोबरही खाऊ शकता. 


नाशपाती : जर तुम्ही नाशपाती सोलून खाल्ली तर त्यातील पोषक घटक कमी होतील. त्यामुळे नाशपती धुतल्यानंतर सालीबरोबरच खा. 


चिकू : चिकूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि लोह असते. तुमची त्वचा निरोगी आणि आतडे निरोगी ठेवण्यास मदत होते.


'या' फळांचया साली काढून खा 


टरबूज : टरबूजाची साल खूप जाड असते. ते खाणे देखील सोपे नाही. त्यामुळे साल काढल्यानंतरच टरबूज खा.


किवी : काही लोकांना किवी फक्त सालीसकट खायला आवडते. पण जर तुम्हाला त्याच्या सालीची एॅलर्जी असेल तर साल सोलूनच खा. 


संत्री : संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असते. मात्र, सालीसट खाल्ल्यावर संत्र्यांची चव कडू लागते.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'या' पदार्थांतून शरीराला मिळतात हेल्दी फॅट; वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त