Weight Loss Food: स्प्राउट्स (Sprouts) अर्थात अंकुरित डाळी आणि कडधान्ये आपल्या शरीरासाठी, तसेच वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अंकुरित कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात. स्प्राउट्स खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप वेळ भूकही लागत नाही, त्यामुळे तुम्ही दुसरे काहीही पदार्थ खावेसे वाटत नाहीत. याचाच परिणाम थेट तुमच्या वजनावर देखील होतो.


स्प्राउट्स खाल्ल्याने तुमच्या वजनात फरक पडतो, कारण त्यात कॅलरीज नसतात. यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. स्प्राउट्स खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया...


फायबर : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता. कारण, एक वाटी स्प्राउट्समध्ये सुमारे 100 ग्रॅम फायबर आढळते. जर, तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये स्प्राउट्सचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी खूप चांगले ठरेल. कारण, यामुळे तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही आणि तुम्ही जास्त खाणे देखील टाळू शकाल.


कॅलरीज : ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनी कॅलरीजचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. दुसरीकडे, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी कॅलरीज घेणे खूप हानिकारक आहे. कारण, कॅलरीज आपले वजन वाढवतात. त्यामुळे तुम्ही जे काही खाता, त्यात कॅलरीज कमी आहेत की, नाही याकडे लक्ष ठेवा.


प्रथिने : स्प्राउट्समध्ये प्रथिने देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. जो कोणी शाकाहारी आहे, तो स्प्राउट्स खाऊन आपले वजन नियंत्रणात आणू शकतो. स्प्राउट्स प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. 100 ग्रॅम स्प्राउट्समध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रथिने आढळतात. अशा प्रकारे, तुम्ही प्रथिनांची गरज पूर्ण करू शकाल आणि त्याच वेळी निरोगी देखील राहाल.


फॅट : जर तुम्ही आहारामध्ये स्प्राउट्सचे सेवन करत असाल, तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कारण, त्यात फॅटचे प्रमाण खूप कमी असते आणि वजन कमी करण्यात ते खूप उपयुक्त ठरते. स्प्राउट्समध्ये फॅट नसते आणि त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. म्हणूनच, याचे सेवन करणे तुमच्यासाठी दुप्पट फायदेशीर ठरेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha