Health Tips : अन्नामध्ये मीठ खूप महत्वाचे आहे हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे. मिठाशिवाय अन्न शिजवता येत नाही. मीठाचं जेवणातील योगदान गरजेचं तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या स्वास्थ्याचीदेखील काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अति प्रमाणात  मीठ खाल्ल्याने अनेक आजार होता. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नेहमी कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेवणात जास्त मीठ घेतल्याने अनेक समस्या निर्माण होतात. यामध्ये किडनीच्या समस्या, हृदयाच्या समस्या, आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या जेवणातील मीठाचे प्रमाण कमी करू शकता. कसे ते जाणून घ्या..


ताजे अन्न वापरा - ताजी फळे, भाज्या, मांस इत्यादींचा जास्तीत जास्त वापर करा. कारण पॅक केलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात. याबरोबरच त्यामध्ये मिठाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे नेहमी ताज्याच पदार्थांचा आहारात समावेश करा. 


फ्रिजमध्ये जास्त वेळ अन्न ठेवू नका - जर तुम्ही फ्रिजमध्ये जास्त वेळ अन्न ठेवत असाल तर अन्नामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे जर तुम्ही रात्रीची उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवली असेल तर लगेच तिचे सेवन करा. अधिक काळ अन्न फ्रीजमध्ये ठेवले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण शिळ्या अन्नामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते.


खाद्यपदार्थाचे लेबल न वाचता वस्तू घेऊ नका - बाजारातून जे काही पॅकेज केलेले अन्न घेत आहात त्याचे लेबल आधी वाचा आणि मगच ते पदार्थ घ्या. मग ते पाकिटात बंद केलेले मसाले असले तरीही त्यांचे लेबल आणि एक्सपायरी तारीख वाचूनच विकत घ्या. अशा पदार्थांत सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते.  त्यामुळे नेहमी पदार्थाची, अन्नाची नीट पारख करूनच अन्न विकत घ्या.   


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha