Belly Fat : सकाळच्या नाश्त्याला ‘ब्रेकफास्ट’ का म्हणतात माहितीये का? ब्रेक फास्ट म्हणजे उपवास सोडणे. नाश्ता करून तुम्ही रात्रभराचा उपवास सोडता म्हणूनच याला ब्रेकफास्ट म्हणतात. रात्रीच्या जेवणात आणि सकाळच्या नाश्त्यात तब्बल 12-13 तासांचे अंतर असते. अशा परिस्थितीत दिवसभरातील पहिले अन्न खूप महत्त्वाचे असते. सकाळचा नाश्ता तुमचे चयापचय सुरळीत होण्यास मदत करतो. मात्र, जर सकाळी नाश्ता केला नाही, तर एनर्जी लेव्हलमध्ये देखील फरक पडतो.


या सगळ्यात जर तुम्ही वजनामुळे किंवा बेली फॅट अर्थात पोटावरील चरबीमुळे चिंतेत असाल, तर नाश्त्यात काय खावे हा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेक लोक सकाळी असे काही पदार्थ खातात ज्यामुळे वजन आणि पोटावरील चरबी देखील वाढते. अशावेळी जर तुम्ही घरगुती, चविष्ट आणि देशी पदार्थांचा विचार करत असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. घरगुती आणि आपल्या नेहमीच्या चवीचे पदार्थ हे पौष्टिक आणि चविष्ट देखील असतात. वजन नियंत्रणातही फायदेशीर ठरतात.  


चीला


बेसन चीला हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. बेसनमध्ये कॅल्शियम भरपूर आहे, जे चयापचय वाढवण्यात आणि चरबी कमी करण्यात मदत करते. चीला बनवण्यासाठी बेसनासह टोमॅटो, हिरव्या मिरच्या, ओवा, आणि कोथिंबीर अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात. या सर्व गोष्टी निरोगी खनिजे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.


दलिया


दलिया फायबर आणि प्रथिने समृद्ध आहे. दलिया सकाळी एनर्जी देण्यासोबतच वजन कमी करण्यास देखील मदत करतो. नाश्त्यासाठी दलिया बनवताना त्यात सर्व प्रकारच्या भाज्या मिसळा.


पनीर भुर्जी


पनीर भुर्जी प्रोटीनने परिपूर्ण असते. पनीरमध्ये दुधाइतकेच पौष्टिक गुणधर्म असतात. त्यात भरपूर भाज्या घाला, यासोबतच चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरच्या घालायला विसरू नका.


कांदेपोहे


कांदेपोहे हा एक अतिशय प्रसिद्ध नाश्त्याचा प्रकार आहे. पोहे पचायला देखील हलके आहेत. त्यात कार्ब्स, प्रोटीन, फायबर आणि फॅट असते. मात्र, पोह्यांची चव आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यात शेंगदाणे घालायला विसरू नका.


उपमा


सकाळच्या नाश्त्यातील उपमा तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवू शकते. रवा हा शरीराला ऊर्जा प्रदान करणारा घटक आहे. उपम्यामध्ये हरभर्‍याची डाळ आणि भाज्या घालून, सकाळच्या नाश्त्यात उपमा खा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha