Homemade Packs For Cracked Heels : हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकांची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते. त्यासाठी लोक वेगळ्या क्रिम वापरतात. काही लोकांच्या पायांना थंडित भेगा पडतात. या भेगा घालवण्यासाठी, तसेच पायांच्या तळव्याची त्वचा मुलायम करण्यासाठी तुम्ही हे होम मेड फॅक तयार करू शकता. जाणून घेऊयात हे घरगुती पॅक तयार करण्याची सोपी पद्धत-
कोरफड जेलचा पॅक-
कोरफड जेल पॅकसाठी लागणारं साहित्य-
कोरफड जेल 2 चमचे, ग्लिसरीन 5 थेंब, नारळाचे तेल 2 चमचे
गरम पाण्यामध्ये पाय 15 मिनीटे ठेवा. त्यानंतर पायांच्या तळव्यांना स्क्रब लाऊन 10 मिनीटे मसाज करा. त्यानंतर पाय धुवा. कोरफड जेल आणि ग्लिसरीन मिक्स करा. कोरफड जेल आणि ग्लिसरीनचा तयार झालेला पॅक पायांना लावा. त्यानंतर 10 मिनीटांनी पाय स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्याला नारळाचे तेल लावा.
मध आणि टी ट्री ऑइलचा पॅक-
साहित्य-
एक चमचा मध,टी ट्री ऑइलचा पॅक 3 थेंब आणि नाराळाचे तेल.
मध, टी ट्री ऑइल आणि नारळचे तेल मिक्स करा. हा पॅक पायांच्या भेगांना लावा. 10 मिनीटांनी पाय स्वच्छ पाण्याने धुवा. हा पॅक आठवड्यातून 3 वेळा लावल्याने तुमच्या पायांच्या भेगा कमी होतील.
साबणाचा वापर कमी करा
हिवाळ्यामध्ये स्किनमधील नॅचरल ऑइल (Natural Oils) कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. साबणाने त्वचेतील नॅचरल ऑइल संपते. त्यामुळे अंघोळ करताना साबणाचा वापर कमी करावा. तसेच थंडीमध्ये अंघोळकेल्यानंतर लोशन किंवा बॉडी ऑयलचा वापर करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss : पोटाची चरबी वाढलीये? भोपळ्याचा ज्यूस ठरतो फायदेशीर, असा करा झटपट तयार
Curly Hair Care Tips : अशी घ्याल कुरळ्या केसांची काळजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha