देशात पेट्रोल- डिझेलच्या (Petrol And Diesel Price) किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या किंमतीत दररोज होणाऱ्या वाढीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, काही लोकांनी तर, सरकारी वाहनातून प्रवास सुरू केला आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Videos) होताना दिसत आहे. या व्हिडिओत एका व्यक्तीने पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचे दिसत आहे. पेट्रोलची किंमत परवडत नसल्याने संबंधित व्यक्तीने आपल्या बाईकला चक्क सायकल बनवली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. 


हेल्मेट किंवा सीटबेल्ट वापरत नसाल तर ही बातमी वाचा... नियम मोडल्यास वाहनचालकांना मोठा दंड लागणार!


देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत चालली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एका व्यक्तीने त्याच्या सायकलला बाईकची बॉडी फीट केली आहे. तसेच तो आरामात ही सायकल चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. 



सरकारी तेल कंपन्यांकडून आज जाहीर करण्यात आलेल्या इंधनाच्या दरात वाढ पाहायला मिळाली. आज डिझेलच्या दरांमध्ये 33 ते 37 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरांत 31 ते 44 पैशांची वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलने कधीच शंभरी ओलांडली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख शहरात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. 


मुंबईत आज पेट्रोलची किंमत 114.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 105.86 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 108.99 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, डिझेल 97.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर 109.46 रुपये, तर डिझेलचे दर 100.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 105.74 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.92 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. 


देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.