Viral: आपल्या आयुष्यात स्वच्छतेचं महत्त्व काय आहे? हे सर्वांनाच माहित आहे. काहीजण आपलं घर, आजूबाजूचा परिसर अशा अनेक गोष्टी स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे रोगराई पसरत नाही, आणि दिसायलाही नीटनेटके दिसते. मात्र असे काही लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात स्वच्छतेच महत्त्वच उरलेलं नाही, हे लोक दिवसाढवळ्या कधीही आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवत नाही, उलट ते ठिकठिकाणी घाण करतात. अशा लोकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. याच स्वच्छतेचं महत्त्व सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण यामध्ये कोणी माणूस नाही, तर चक्क एका माशाने ही स्वच्छतेची जबाबदारी घेतली आहे. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जाणून घ्या...


 


प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे धोके प्राण्यांनाही कळू लागलेत..!


सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये समुद्रातून प्लास्टिकचा कचरा बाहेर काढताना एक सील मासा दिसत आहे. हे दृश्य मनमोहक तर आहेच, पण प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे धोके प्राण्यांनाही कळू लागले आहेत, हे दर्शवते. व्हिडीओमध्ये सील मासा समुद्रात तरंगणारा प्लास्टिकचा तुकडा उचलून किनाऱ्यावर असलेल्या डस्टबिनमध्ये टाकताना दिसतोय.


 


सील मासाचे शहाणपण पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


ही आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय घटना कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधले. व्हिडीओ पाहून अनेकांना सीलच्या या कृतीचा धक्का बसला असून पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक संदेश म्हणून ते पाहत आहेत. हा व्हिडीओ केवळ सीलची बुद्धिमत्ताच दाखवत नाही, तर प्लॅस्टिक प्रदूषणाचा सागरी जीवनावर कसा परिणाम होतो, याकडेही गांभीर्याने लक्ष वेधते.


 






 


 


कचरा... समुद्राची समस्या


प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून समुद्रात राहणाऱ्या जीवांसाठी तो मोठा धोका बनला आहे. मानवाला आता पर्यावरणाप्रती अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे, हे सीलने दाखविलेल्या या कृतीने सिद्ध झाले आहे. प्रदूषणापासून सागरी जीवांचे संरक्षण करण्यासाठी आणि महासागर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे.



व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक काय म्हणाले?


हा व्हिडीओ पाहून लोक याला पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणादायी मानत आहेत आणि सोशल मीडियावर या मोहराचे कौतुक करताना थकत नाहीत. व्हिडीओखाली अनेक युजर्सनी लिहिले की, जर प्राण्यांनाही पर्यावरणाच्या रक्षणाचे महत्त्व समजू शकत असेल, तर मानवानेही या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देणारा एक महत्त्वाचा संदेशही आहे.


 


हेही वाचा>>>


Viral: 15 फूट खोल विहीर..खोल पाण्यात नवरा-बायको गाडीसह पडले.. अचानक 'असा' घडला चमत्कार! सर्वांच्या भुवया उंचावल्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )