Viral: दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. पण वाटेतच अचानक असं काही तरी घडेल, याची जराही कल्पना त्यांना नव्हती. हे जोडपं सुट्टीसाठी घरी जात होते पण वाटेत एक मोठा अपघात झाला आणि दाम्पत्य कारसह विहिरीत पडलं. मात्र त्यानंतर एक चमत्कार घडला. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. ही घटना केरळमधील एर्नाकुलम येथील आहे.



दोन महिन्यांपूर्वीच या जोडप्याचे लग्न झाले होते


दोन महिन्यांपूर्वीच या जोडप्याचे लग्न झाले. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर नवरा-बायको घरी जाणार होते. नवरा एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काम करतो, तर बायको ही कृषी विद्यार्थिनी आहे. दोघेही कर्नाटकातील कोट्टारकारा  येथून अलुवा येथे जात होते. परंतु त्यांची कार एर्नाकुलममधील कोलेनचेरी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. विहीर 15 फूट खोल होती, त्यात 5 फूट पाणी होते. ही विहीर रस्त्याच्या कडेला बांधली असल्याने हे जोडपं गाडीमधून थेट विहीरीत जाऊन पडलं.


 


कार खड्ड्यात आदळली, जोडपं विहिरीत पडलं


नवऱ्याने सांगितले की, आमची कार रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने हा अपघात झाला आणि कारचे नियंत्रण सुटले. यानंतर कार रस्त्याच्या कडेला गेली आणि बाजूच्या विहिरीला धडकली. विहिरीभोवती भिंती बांधल्या होत्या, मात्र कार भिंत तोडून विहिरीत पडली.


 


 






 


रस्त्यावर खड्डा होता, तो पाण्याने भरला होता. 


घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ही घटना रात्री 9.20 च्या सुमारास घडली. रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. खड्डा पाण्याने भरला त्यामुळे दाम्पत्याला समजू शकले नाही. गाडी खड्ड्यात गेल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली. यानंतर ती रस्त्यावर उतरली आणि 30 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत पडली.


 


आणि त्याने विहिरीत शिडी टाकली 


कार विहिरीत पडल्यानंतर मोठ्या संख्येने लोक मदतीला आले आणि एका मदतनीसाने सांगितले की त्याने विहिरीत शिडी टाकली. तोपर्यंत नवरा-बायकोला बाहेर काढून गाडीच्या छतावर बसवले. यानंतर दोघेही जिन्याने वर आले. नवऱ्याने सांगितले की, आम्हाला दुखापत झाली नसून कारची दुरवस्था झाली आहे. आपण फक्त मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहोत.


 


हेही वाचा>>>


Viral: महिलेने चक्क झोपून कमावले 9 लाख रूपये! नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का..असं घडलं तरी काय? एकदा वाचाच...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )