Viral: आजकाल मेट्रोमोनिअल साईट्सचा सुळसुळाट झाला आहे. अनेक जण आपल्याशी अनुरुप असलेला आय़ुष्यातील जोडीदार मिळावा यासाठी या साईटची मदत घेतात. या साईटवर अनेक तरुण-तरुणीच्या प्रोफाईल असतात. पण त्या कितपत खऱ्या असतात. याची शहानिशा न करता लोक लग्न करतात, अनेकदा याचा परिणाम म्हणून लोकांची फसवणूक झाल्याचंही समोर आलंय. असाच एक प्रकार एका दुसऱ्यांदा लग्न करू पाहणाऱ्या तरुणासोबत घडला, पण वेळीच तो सावध झाला म्हणून सपशेल वाचला आहे. एका महिलेने तिच्या भावी नवऱ्याला वार्षिक 30 लाखांऐवजी 3 लाख रुपयांचे पॅकेज मिळत असल्याचे समजल्यावर त्याचा घोर अपमान केला. पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर त्याच्या संभाषणाचा हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. आपल्या भावी आयुष्याच्या जोडीदाराने त्याच्याशी कसे गैरवर्तन केले हे त्याने सांगितले आहे.


जगासमोर हावरट दिदीचं पितळ उघडं पडलं.. नेमकं घडलं तरी काय?


पहिलं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर एका तरुण-तरुणीला दुसऱ्यांदा लग्न करायचं होतं. हे दोघेही आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. या दोघांच्याही व्हायरल झालेल्या चॅटमध्ये ते दोघं गप्पा मारत असताना, प्रथम महिला पुरुषाला लवकरात लवकर लग्न करण्यास सांगते, तर त्या पुरुषाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी जास्त वेळ हवा असतो. तर यावर महिलेचे म्हणणे आहे की जर काही विलंब झाला तर दुसरा जोडीदार शोधू.. असंच बोलता बोलता पुरूष म्हणतो की, मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे, सॉरी.. माझा पगार 30 रुपये नाही तर 3 लाख रुपये आहे. मॅट्रिमोनिअल साइटच्या प्रोफाईलमध्ये टायपिंगची चूक झाल्याचे त्याने सांगितले. आणि जशी ही गोष्ट महिलेला समजली, तसे तिने त्या पुरुषाला शिव्यांची लाखोली वाहिली, आणि त्याचा अपमान करायला सुरूवात केली. 


 






 


महिला आणि तिच्या आईची पुरूषाला धमकी


पीडित पुरुषाने सांगितले की, ती महिला त्याच्याशी सुरूवातील छान बोलली. पण पगार 30 रुपये नाही तर 3 लाख रुपये असल्याचे सांगत मॅट्रिमोनिअल साइटच्या प्रोफाईलमध्ये टायपिंगची चूक झाल्याचे सांगितले. यानंतर महिलेने अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. नंतर महिलेच्या आईनेही त्या पुरुषाला खूप धमक्या दिल्या. ही चॅट किश सिफ नावाच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून शेअर करण्यात आली आहे. त्याच्या बायोमध्ये, तो सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनचा समुपदेशक असल्याचं म्हटलं आहे, जी पुरुषांच्या हक्कांसाठी काम करणारी एक NGO आहे.


 






 


नेटकऱ्यांकडून कडाडून प्रतिक्रिया, महिलेला हावरट म्हटलं


दुसऱ्या पोस्टमध्ये, त्या व्यक्तीने सांगितले आहे की, त्याला कळले की त्या महिलेने नुकताच तिच्या पतीला घटस्फोट दिला आहे. आणि तिने तिच्या माजी पतीकडून भरपाई म्हणून चांगली रक्कम घेतली आहे. महिलेने तिच्या सासरच्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आणि तडजोडीच्या नावाखाली 80 लाख रुपये घेतल्याचा त्या व्यक्तीचा दावा आहे. तर संभाषणात ती म्हणायची की, तिने तिच्या पतीकडून एक पैसाही घेतला नाही. या पोस्टवर कमेंट करणारे अनेक लोक महिलेला पैशाचा लोभी म्हणत आहेत. ती महिलेली हावरट म्हटलंय.. म्हणे बाकी काही नाही.


हेही वाचा>>>


Lifestyle: 'सब मोह माया है, मग हातात 2 लाखाची चामड्याची बॅग कशी?' जया किशोरी 'त्या' बॅगमुळे ट्रोल, स्वत: सांगितलं सत्य! 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )