Arjun Bijlani Birthday: टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी सध्या त्याची पत्नी नेहासोबत रोमँटिक हॉलिडेवर गेलाय. आपला वाढदिवस तो आफ्रिकेतल्या बीचवर साजरा करताना दिसतोय. जोडीदारासोबत प्रवास करणे ही सर्वोत्तम गोष्टींपैकी एक असल्याचं त्याने म्हटलंय. अर्जुन ना आपल्या सुट्टीतील काही रोमँटिक अंदाज आतले फोटो शेअर केले आहेत. मागे चमकणारा निळाशार समुद्र आणि पत्नीसोबत बीचवर रोमान्स करताना अर्जुन दिसतोय. पत्नीच्या मानेचे चुंबन घेतानाचा फोटो पोस्ट करत 'आणखी एक आठवणींचा संच बंद झाला..' असं त्यावर लिहिलं आहे. त्याच्या या फोटोने नेटकरीही घायाळ झाले आहेत.
अर्जुन ने एकता कपूरच्या कार्तिक या शो मधून टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण केला आहे. लेफ्ट राईट लेफ्ट, मिली जब हम तुम, मेरी आशिकी तुमसे ही, नागिन आणि इश्क मे मर जावा मधील भूमिकांसाठी अर्जुन बिजलानी प्रसिद्ध आहे.
मुलाला सोडून पहिला हॉलिडे!
अर्जुन भिजलारीने 2013 मध्ये त्याच्या जोडीदार नेहाशी लग्न केलं. जानेवारी 2015 मध्ये त्यांना एक लहान मुलगा झाला ज्याचे नाव आयान बिजलानी असा आहे. आई आणला सोडून हा त्याचा पहिलाच हॉलिडे असल्याचेही त्यांना सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सांगितले यात त्याने बीचवर नेहा सोबत चालताना फोटो टाकत आयन शिवायचा आमचा पहिला हॉलिडे.. आम्ही तुला करतोय पण हा आमचा वेळही गरजेचाच होता असा कॅप्शन त्याने या फोटोला दिलाय.
खतरो के खिलाडी आणि फियर फॅक्टर मध्येही केलं काम
2016 मध्ये अर्जुन बिजलानीचा डायरेक्ट इश्क हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर 2020 मध्ये त्याने स्टेट ऑफ सीरिया वेब सिरीज मध्येही काम केलं. त्यानंतर रियालिटी शो मध्ये फियर फॅक्टर खतरो के खिलाडी 11 मध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यात तो विजयी झाला. लाफ्टर शेफ फन अनलिमिटेड मध्ये ही तो यापूर्वी दिसला होता.