Valentine Day Gift Ideas : प्रेमात असलेल्या जोडप्यांसाठी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) आणि व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) खूप खास असतात. कपल्स वर्षभर व्हॅलेंटाईन डेची वाट बघतात. यानिमित्त जोडपे एकमेकांना भेटवस्तूही देतात. हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी खास करायचं असतं. काही लोक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या जोडीदारांना भेटवस्तू देखील देतात. या खास दिवसानिमित्त बॉयफ्रेंडसाठी खास भेटवस्तू घेण्याची तुमचीही इच्छा असेल पण काय सरप्राईज गिफ्ट द्यावं याबाबत संभ्रम असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही बेस्ट गिफ्ट पर्याय घेऊन आलो आहोत.


'व्हॅलेंटाईन डे' निमित्त प्रियकराला गिफ्ट काय द्यायचं या विचारात असाल तर, ही बातमी वाचा. गिफ्ट पर्यायांची यादी पाहा.


कस्टमाईज आइटम्स


तुम्ही बॉयफ्रेंडला कस्टमाईज टी-शर्ट, कप किंवा तुमच्या सुंदर आठवणींची फोटो बुक यासारख्या कस्टमाईज वस्तू देऊ शकता. याशिवाय, आजकाल व्हायरल होत असलेला किस टी-शर्टही तुम्ही देऊ शकता. याशिवाय त्यांच्या आवडत्या ब्रँडचे कपडे खरेदी करणे चांगला पर्याय ठरेल. तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या रंगाचे किंवा स्टाईलचे कपडे देखील देऊ शकता.


ग्रूमिंग किट 


ग्रूमिंग किट हा मुलांसाठी आवश्यक वस्तू आहे. तुम्ही मॉइश्चरायझर, फेस वॉश असं ग्रूमिंग किट प्रियकराला भेट देऊ शकता. या ग्रूमिंग किटसोबत तुम्ही त्यांना ट्रिमर देखील देऊ शकता. ट्रिमर तुमच्या बजेटमध्ये बसेल आणि तुमच्या प्रियकरालाही हे गिफ्ट नक्की आवडेल.


स्मार्टफोन ॲक्सेसरीज


जर तुमचा बॉयफ्रेंड गॅझेट फ्रीक असेल, तर तुम्ही त्याला ब्लूटूथ हेडफोन, वायरलेस चार्जिंग पॅड किंवा स्मार्टवॉच यासारख्या स्मार्टफोन ॲक्सेसरीज भेट देऊ शकता. 


कार्ड होल्डर 


कार्ड होल्डर ही मुलांसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या प्रियकराला कार्ड होल्डर भेट देऊ शकता. तो त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी जसे की एटीएम, क्रेडिट कार्ड, व्हिजिटिंग कार्ड या कार्ड होल्डरमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा जेव्हा त्याला त्या कार्डची आवश्यकता असेल तेव्हा तो कार्डधारक पाहून तुम्हाला आठवेल.


घड्याळ


जर तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचे असेल तर फोटो फ्रेम आणि घड्याळ हा एक चांगला पर्याय आहे. तरुणांना अनेकदा ॲक्सेसरी गिफ्ट्स आवडतात. आजकाल बाजारात विविध प्रकारची घड्याळे आणि रंगीबेरंगी फोटो फ्रेम्स उपलब्ध आहेत. गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडला घड्याळ भेट देऊ शकते. फोटो फ्रेममध्ये तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा फोटो टाकून तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्टही करू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Paytm ED Probe : पेटीएमच्या अडचणी वाढणार? आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशीची टांगती तलवार