Paytm Payments Bank ED Probe : पेटीएम पेमंट बँकच्या (Paytm Payments Bank) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पेटीएम बँकेवर (PayTM Bank) कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पेटीएमने (Paytm Payments Bank Ltd) तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) आज पेटीएम बँकेवर (Paytm Bank) निर्बंध जारी केले आहेत. त्यानंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेवर ईडी (ED) चौकशीची टांगती तलवार आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितलं आहे की, आर्थिक गैरव्यवहाराचे कोणतेही नवीन आरोप आढळल्यास अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करेल.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी वाढणार
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेत केवायसी नसलेली अनेक खाती आढळून आली आहेत, ज्यासाठी बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाला (ED) ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मनी लाँड्रिंगसारख्या बेकायदेशीर कामांचे पुरावे आढळल्यास, पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध ईडीची चौकशी सुरू केली जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेटीएम बँकेत निष्क्रिय खाती देखील मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत.
महसूल सचिवांनी तपासाचे संकेत
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे की, जर पेटीएम पेमेंट्स बँकेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले, तर त्याचा तपास ईडीकडे (ED) सोपविला जाऊ शकतो. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट बँकेतील निष्क्रिय खाती मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरली जाऊ शकतात, असा संशय सेंट्रल बँकेला आहे. त्यामुळे ईडीला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याशिवाय आरबीआयने ही माहिती गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला (PMO) देखील पाठवली आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेने मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळले
दरम्यान, पेटीएम पेमेंट बँकेच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की, ''पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि पेटीएम पेमेंट्स बँकेची आतापर्यंत ईडीकडून कधीही चौकशी करण्यात आलेली नाही. आमचे प्लॅटफॉर्म वापरणारे काही व्यापारी चौकशीला सामोरे जात आहेत. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना नेहमीच योग्य ती उत्तरे दिली आहेत. आम्ही मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळतो आणि तुम्हा सर्वांना सट्टेबाजीपासून सावध करतो.''
आरबीआय, ईडी, अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पीएमओ गप्प
विविध मीडिया कंपन्यांशी संपर्क साधूनही आरबीआय, ईडी, वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पीएमओ यांनी याप्रकरणावर कोणतीही माहिती दिलेली नाही. बुधवारी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीपर्यंत ठेवी आणि वॉलेटसह त्यांचे बहुतांश व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. नियमांचे पालन न केल्याच्या आरोपावरून आरबीआयने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेचे शेअर्स कोसळले होते. कंपनीचे बाजारमूल्यही झपाट्यानं घसरलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :