Shane Warne: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. शेन वॉर्न थायलंडमध्ये असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेन वॉर्नच्या निधनाची बातमी क्रिडाविश्वासाठी सर्वात मोठा धक्का देणारी होती. कारण जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत वॉर्नचे नाव समाविष्ट आहे. आज शेन वार्न आपल्यात नसला तरी क्रिकेट विश्वात त्यानं केलेले विक्रम आजही कायम आहेत. त्यापैकी एक म्हणजे,  बॉल ऑफ द सेंच्युरी! शेन वार्नच्या या चमत्कारी चेंडूची आजही चर्चा आहे.  या चेंडूला आज 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. 


बॉल ऑफ द सेंच्युरी का म्हटलं गेलं?
शेन वार्नच्या त्या चेंडूला बॉल ऑफ द सेंच्युरी का म्हटलं गेलं? हे आपण जाणून घेऊयात. शेन वार्ननं 4 जून 1993 रोजी अॅशेस मालिकेतील एका कसोटी सामन्यादरम्यान एक उत्कृष्ट चेंडू फेकला होता, ज्याला पाहून जगातील प्रत्येक खेळाडू आश्चर्यचकित झाला होता. वॉर्ननं टाकलेला चेंडू 90 डिग्रीच्या एंगलनं टर्न झाली होती. यामुळे या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' नाव देण्यात आलं. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला अशाप्रकारचा चेंडू टाकता आलेला नाही. 


दिग्गज गोलंदाजांमध्ये वॉर्नचा समावेश
शेन वॉर्नच्या गोलंदाजीसमोर अनेक दिग्गज क्रिकेटपटू डगमगताना दिसले आहेत. जगातील सर्व मोठे फलंदाज त्याच्यासमोर फलंदाजी करण्यास टाळाटाळ करत असत. कारण शेन वॉर्नच्या फिरकीनं विकेट कधी घेतली? हे कोणालाच कळत नव्हतं. त्याच्या गोलंदाजीचे असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. शेन वॉर्नचे चाहते फक्त ऑस्ट्रेलियातच दिसत नाहीत, तर जगभरात त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. 


शेन वॉर्नची कारकिर्द
शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. वॉर्ननं 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने 37 वेळा 5 विकेट्स तर 10 वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एका कसोटी सामन्यात 128 धावा देऊन 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी होती. तर 194 एकदिवसीय सामन्यात त्यानं 293 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. वॉर्नची एकदिवसीय क्रिकेटमधील 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती.


व्हिडिओ-



हे देखील वाचा-