Trending Homemade Foods : भारतीय पदार्थ जगभरात खवय्येप्रेमींना खूप आवडतात. मग, ते स्ट्रीट फूड असो किंवा पारंपरिक घरगुती पदार्थ सगळेच अगदी पदार्थांवर ताव मारतात. भारतीय जेवण अगदी सातासमुद्रापार गेलं आहे. तसेच, हेल्दी लाईफस्टाईलमुळे अनेक जण बाहेरचं खाणं देखील टाळतात आणि घरच्या जेवणाला पसंती देतात. 2023 हे वर्ष सरणार आहे, त्यामुळे या वर्षी स्ट्रीट फूडबरोबरच अनेक घरगुती पदार्थही खूप प्रसिद्ध झाले आहेत.


मास्टरशेफ हॅरी यांनी या वर्षी कोणते घरगुती पदार्थ ट्रेंडमध्ये होते या संदर्भात माहिती सांगितली आहे. हॅरी मास्टरशेफमध्येही दिसला आहे. या घरगुती रेसिपी फक्त खायला चविष्ट नसून आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. चला तर मग या रेसिपी नेमक्या कोणत्या आहेत आणि ते बनविण्याची पद्धत कोणती आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मटार पकोडे 


मास्टरसेफ हॅरी सांगतात की, यावर्षी लोकांना मटार पकोड्यांची घरगुती रेसिपी लोकांना खूप आवडली आहे. मटार पकोडे तयार करण्यासाठी, उकडलेले मटार, गव्हाचे पीठ, रवा, मीठ, मिरची आणि हिरवे धणे यांसारख्या गोष्टी वापरल्या जातात. मटर पकोडे तुम्ही सॉस किंवा चटणी याबरोबर देखील खाऊ शकता. 


व्हेगन व्हाईट सॉस पास्ता


पास्ता हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पास्ता खायला आवडतो. पास्ता बनवण्यासाठी काजू, उकडलेले पास्ता, कांदा, लसूण पेस्ट, पास्ता मसाला आणि ऑलिव्ह ऑईल आवश्यक आहे. या वर्षी अनेकांची पसंती ही व्हेगन व्हाईट पास्ता या रेसिपीला होती. 


गार्लिक ब्रेड


लोक गार्लिक ब्रेडही मोठ्या उत्साहाने खातात. गार्लिक ब्रेड बनविण्याची रेसिपीही फार सोपी आहे. यासाठी ब्रेड, बटर, लसूण आणि कोथिंबीर वापरली जाते. लोकांना नाश्त्यात चहा किंवा कॉफीसोबत गार्लिक ब्रेड खायला आवडते.


दक्षिण भारतीय जेवणाचा आनंद 


साउथ इंडियन डिलाईटमध्ये लोकांना पनीर पाडू, गाजराची कोशिंबीर आणि बीटरूट चटणी आवडली. ही रेसिपी पण सोपी आहे. ते बनवण्यासाठी कॉर्न फ्लोअर, पनीर, डोसा पिठ, मिरची पावडर वापरतात. ही रेसिपी पॅनमध्ये बनविण्यात आली आहे. तर, बीटरूट चटणीसाठी शिजवलेले बीटरूट, कांदा, चिंच, गूळ आणि खोबरे यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.  


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय