Travel : भारतात शनिदेवांची अनेक मंदिरं आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर हे स्वयंभू स्थान असल्याचं सांगितलं जातं, जर तुम्ही इतर मंदिरात पाहिले तर शनिदेव हे कावळा किंवा म्हशीवर बसलेले आढळतील.  मात्र भारतातील हे एक असे अद्भूत मंदिर आहे, जिथे देव चक्क हत्तीवर स्वार आहे. आणि या मंदिरात दर्शन घेतल्याने भाविकांचे सर्व दु:ख दूर होते, अशी धारणा आहे. जाणून घेऊया या मंदिरा विषयी..



साडेसाती आणि ढैय्यापासून मिळेल आराम


शनिजयंतीला तसेच शनिवारी शनिदेवाच्या या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. असे मानले जाते की जो व्यक्ती शनिदेवाची पूजा करतो. त्याला शनीची साडेसाती आणि ढैय्यापासून आराम मिळू शकतो. आता अशा स्थितीत भारतातील सर्व मंदिरांमध्ये तुम्ही अनेकदा शनिदेवाला कावळा आणि म्हशीवर स्वार होताना पाहिले असेल. पण मध्य प्रदेशातील इंदूरमधील उषा नगरमध्ये शनिदेव चक्क हत्तीवर आहेत. या मंदिरा बद्दल लोकांची श्रद्धा काय? एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिषी पंडित अरविंद त्रिपाठी यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया.


 


हत्तीवर स्वार शनिदेव हे धन आणि ऐश्वर्याचे प्रतिक 


अशा प्रकारचे पहिले शनि मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहे, जेथे शनिदेव हत्तीवर विराजमान आहेत. त्यामुळे येथे शनिदेवाला श्री गजासीन शनिदेव म्हणतात. ज्योतिषी सांगतात की, हत्ती हे शौर्य, बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणाचे प्रतीक मानले जाते. शनिदेव हत्तीवर स्वार होणे हे लक्षण आहे की एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वभावात नम्रता आणणे आणि शांततेने जगणे. या मंदिराला भेट दिल्याने माणसाचा राग कमी होतो आणि मनःशांतीची अनुभूतीही मिळते. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामात कोणतीही अडचण येत असेल तर त्यातूनही त्याला आराम मिळतो. हत्तीवर विराजमान झालेले शनिदेव हे धन आणि ऐश्वर्य यांचेही प्रतिक मानले जाते असे शास्त्रात सांगितले आहे.




आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळते..!



ज्योतिषाच्या मते शनिदेव हे कर्मप्रधान देवता मानले जातात. कारण त्यांच्याकडे सर्व लोकांची चांगली आणि वाईट कृत्ये आहेत. त्या आधारे शनिदेव व्यक्तीला फल प्रदान करतात. तर हत्ती हे बुद्धिमत्ता, शक्ती आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. शनिदेवाची हत्तीवर स्वार झालेली प्रतिमा हे दर्शवते की कितीही उशीर झाला तरी आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. हे देखील दर्शविते की शनिदेव ज्ञानी आणि न्यायी आहेत आणि ते नेहमी सत्य आणि धर्माचे रक्षण करतात. शनिदेवाचे हत्तीवर आगमन झाल्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश येऊ शकते. जर तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही त्यांची पूजा करू शकता, शनिदेव चालिसाचा पाठ करू शकता आणि गरजूंना मदत करू शकता.


 


हेही वाचा>>>


Travel : भारतातील एक दैवी शक्तीपीठ! 'येथे' पडला होता देवी सतीच्या स्तनाचा तुकडा? 'अशी' करा ट्रीप प्लॅन


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )