Nagpur Accident News नागपूर : नागपूच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना 22 मे रोजी एका भरधाव कार ने धडक दिली होती. त्यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला सर्वांना तो एक रस्त्यावर घडणारे हीट अँड रन (Nagpur Accident) चा  प्रकार वाटला होता. मात्र, नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीने घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.


हिट अँड रन चा प्रकार नव्हे, तर ती सुनियोजित हत्याच!


सखोल तपासानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना अटक केली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक देणाऱ्या कार मध्ये हे दोघे स्वार होते. तर पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मुलाकडे वाहनचालक म्हणून काम करणारा सार्थक बागडे या प्रकरणी फरार आहे. सार्थक बागडेनेच पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी अपघात घडवण्याचे सांगितल्याची कबुली याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी दिली आहे. याप्रकरणी सार्थक बागडे याला अटक केल्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांची अपघाताचा भास निर्माण करून हत्या करण्यास त्याला कोणी सांगितले होते, हे सुपारी किलिंगचा प्रकार आहे का, याचा उलगडा आता होणार आहे.


नेमकं प्रकरण काय?


पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरण (Porsche Car Accident) राज्यभरात गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरामध्ये अशाच पद्धतीची घटना घडली आहे. नागपूरमधील मानेवाडा संकुलातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका चारचाकी गाडीने धडक दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना यामध्ये पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. तर पुढील तपासात पोलिसांनी घटनेमधील आरोपी ज्यांनी पुट्टेवार यांना धडक दिली त्यांना ताब्यातही घेतले होते. मात्र, वरकरणी हे प्रकरण जरी अपघात असल्याचे वाटत असलं तरी, हा सुनियोजित पद्धतीने घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या