Travel : समुद्राच्या अगदी मध्यभागी असलेले एक छोटंसे बेट, हे एक असे ठिकाण आहे जे स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदनवन मानले जाते. अगदी समुद्राच्या मधोमध वसलेले एक छोटेसे बेट हे पक्षीनिरीक्षक आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी पर्वणीच ठरते. तुम्हालाही जर आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून शांतता आणि निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर या ठिकाणी एकदा भेट दिलीच पाहिजे. नेमके कुठे आहे हे ठिकाण? जाणून घ्या...


 


जेव्हा अरबी समुद्रात ओहोटी येते तेव्हाच हे बेट दिसते..


हे शहर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर म्हणजेच देवभूमीत वसलंय. ते शहर म्हणजे देवबाग... इथे समुद्राच्या मध्यभागी वसलेले बेट सीगल आयलंड किंवा त्सुनामी बेट म्हणून ओळखले जाते. याची खासियत म्हणजे,  हे बेट नेहमीच दिसणारे बेट नाही. तर हे बेट समुद्राच्या खाली लपलेले असते, पण जेव्हा अरबी समुद्रात ओहोटी येते तेव्हा हे बेट बाहेरून दिसते. आणि तेव्हा जणू पांढरा शुभ्र गालिचा पसरल्याचा भास होतो. सीगल पक्ष्यांचे थवे या बेटाला पूर्णपणे झाकून टाकतात, केवळ वर्षाच्या ठराविक वेळीच हे त्सुनामी बेट पाण्याबाहेर दिसते. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते मार्च या काळात समुद्रात ओहोटी आल्यावर सीगल बेट पूर्णपणे दिसते. बेट बाहेर येईपर्यंत ते पूर्णपणे सीगल पक्ष्यांनी व्यापलेले असते. त्या काळात या ठिकाणचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे.




कोकण किनाऱ्यावरून छोट्या बोटीतून बेटावर जाण्याचा अनुभव खास



या बेटावर पोहोचण्यासाठी कोणत्याही पर्यटकाला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. देवबाग बीचचे स्थानिक मच्छीमार तुम्हाला या छोट्या सुंदर बेटावर घेऊन जातात. कोकण किनाऱ्यावरून छोट्या बोटीतून या बेटावर जाण्याचा अनुभवही खास आहे. या काळात, आपण काळजीपूर्वक पाहिल्यास, तुम्हाला बोटीभोवती डॉल्फिन देखील दिसतील, आणि हेच कारण आहे जेव्हा पर्यटकांना देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आवडते. लोक सहसा येथे आराम करण्यासाठी आणि शांततेत काही वेळ घालवण्यासाठी येतात. याशिवाय, जर तुम्हाला साहसी किंवा वॉटर स्पोर्टस आवडत असतील तर, कायाकिंग, पॅरासेलिंग, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग इत्यादी अनेक प्रकारच्या अॅक्टीव्हिटी देखील येथे केल्या जातात. दिवसभर पाण्यावर आणि इतर अनेक उपक्रमांनंतर, इथल्या स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय हा प्रवास संपत नाही


 


ताज्या सीफूडसाठी प्रसिद्ध, खवय्यांची रेलचेल


देवबाग हे ताज्या सीफूडसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे गेल्यास लॉबस्टर फ्राय, पोमफ्रेट करी किंवा मालवणी फिश फ्राय खाण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते




त्सुनामी बेटाला भेट देण्यासाठी कसे पोहचाल?


मुंबई ते देवबाग बीच हे अंतर सुमारे 10 तास आहे. 
मुंबईहून देवबागला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे येथे जाणे सोपे होते. 
जर तुम्ही रस्त्याने देवबागला येण्याचा विचार करत असाल तर भाड्याने गाडी घेणे उत्तम. 
याच्या मदतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार थांबे घेऊन संपूर्ण प्रवास पूर्ण करू शकाल आणि तुमच्या सोयीनुसार परतही येऊ शकाल. 
याशिवाय मुंबई ते देवबाग ही बससेवा उपलब्ध आहे. 


 


हेही वाचा>>>


Travel : एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य.. निसर्गाची साद अन् जोडीदाराची साथ.. महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणतात 'या' ठिकाणाला


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )