IPL 2024 Rohit Sharma And Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) आयपीएल 2024 (IPL 2024) मधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या हंगामाच्या सुरुवातीला हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यापासूनच चाहते व संघात अंतर्गत नाराजी पसरली होती. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागला. आगामी 17 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर सामना होणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील हा शेवटचा सामना खेळणार आहे.


हार्दिक पांड्या व संघातील सीनियर खेळाडूंमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्याही अधूनमधून येत होत्या. तसेच अनेक व्हिडीओदेखील समोर आले होते. त्यामधून रोहित आणि हार्दिकमध्ये काहीतरी वाद असल्याचं दिसून आले. याचदरम्यान सराव सत्रातही रोहित व हार्दिक यांच्यातला वाद स्पष्टपणे दिसला. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचे खेळाडू मैदानात सराव करत होते. यावेळी हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माने एकत्रित सराव केला नाही. 


हार्दिक जेव्हा सरावासाठी नेट्समध्ये आला तेव्हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी नेट्समधून काढता पाय घेतला. हाती आलेल्या वृत्तानुसार, हार्दिक व रोहित यांनी एकत्रित सराव केला नाही. कोलकाताविरुद्धच्या लढतीपूर्वीची ही घटना आहे. आधी रोहितने नेट्मध्ये फलंदाजीचा सराव केला आणि तेव्हा हार्दिक जवळपास नव्हता. पण, जेव्हा हार्दिक फलंदाजीसाठी नेट्समध्ये आला, तेव्हा रोहित सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यासोबत मैदानाबाहेर गेल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबई इंडियन्समधील हा वाद कुठपर्यंत जातो, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


रोहित अन् आगरकर यांना हार्दिक पसंत नव्हता...


आयपीएल 2024 च्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या साजेशी कामगिरी केली नाही. याशिवाय हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून आपली छाप सोडू शकलेला नाही. मात्र यानंतरही हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान देऊन उपकर्णधारपदही देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. खरेतर कर्णधार रोहित शर्मा आणि राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना हार्दिक पांड्याला संघात देखील स्थान द्यायचे नव्हते. मात्र, बीसीसीआयच्या दडपणाखाली या दोघांनी हार्दिकला संघात घेतल्याचा खुलासा झाला आहे.


संबंधित बातम्या:


आयपीएलमधील यशस्वी प्रशिक्षक घेणार राहुल द्रविडची जागा; बीसीसीआय करतेय चतुर दिग्गजाचा विचार


IPL 2024: संत्र्याची तुलना सफरचंदाशी करु नको...; गौतम गंभीर एबी डिव्हिलियर्सवर संतापला, हार्दिक पांड्यासाठी मैदानात उतरला!


वेस्ट इंडीज अन् अमेरिकेत रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार; सामना कधी सुरु होणार, कुठे फ्रीमध्ये पाहता येणार?, जाणून घ्या