Travel : महाराष्ट्र हे भारतातील मुख्य राज्य असण्यासोबतच एक सुंदर पर्यटन केंद्र म्हणूनही जगभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की देश-विदेशातून तसेच विविध राज्यातील अनेक लोक येथील विविध ठिकाणी भेट देतात. या राज्यात असलेल्या जगप्रसिद्ध ठिकाणं, समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्यानी परिपूर्ण ठिकाणं, किल्ले, गुहा आणि मंदिरं दररोज हजारो लोकांना आकर्षित करतात. 


 


महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं Adventure ट्रेकिंगसाठी बेस्ट!


महाराष्ट्राचं रूप पावसाळ्यात अधिकच खुलून दिसतं. इथली सुंदर आणि मनमोहक ठिकाणं हे आश्चर्यकारक साहसी ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. ही ठिकाणं पाहण्यासाठी दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक येतात. या लेखात, आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही प्रमुख साहसी आणि ट्रेकिंग ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही मित्रांसह मजा आणि उत्साहासाठी भेट देऊ शकता.




लोहगड किल्ला  - निसर्गप्रेमींसाठी नंदनवन 


महाराष्ट्रातील कोणत्याही हिल स्टेशनचा शोध घेण्याची जेव्हा चर्चा होते तेव्हा लोणावळ्याचा उल्लेख नक्कीच होतो. लोणावळ्यापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला लोहगड किल्ला आणि येथील ट्रेक पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय मानला जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे 3 हजार फूट उंचीवर असलेल्या लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी गवताळ भाग, लहान-मोठे खडक आणि ओबड-धोबड रस्त्यामधून चढावे लागते. हा किल्ला केवळ ट्रेकिंगचे ठिकाणच नाही तर निसर्गप्रेमींसाठी नंदनवन देखील आहे. गडाच्या माथ्यावरून आजूबाजूचे दृश्य पाहून कोणाचेही मन मोहल्याशिवाय राहणार नाही.




कळसूबाई शिखर - महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट


महाराष्ट्रातील सर्वात प्रेक्षणीय आणि आश्चर्यकारक ट्रेकचे नाव घेतले, तर कळसूबाई शिखर ट्रेकचे नाव सर्वात वर आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असलेला हा ट्रेक साहसप्रेमींमध्ये नंदनवन मानला जातो. कळसूबाई हे समुद्रसपाटीपासून 5,400 फूट उंचीचे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराचे सौंदर्य इतके लोकप्रिय आहे की त्याला महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट असेही म्हणतात. कळसूबाईची ट्रेकिंग बारी गावातून सुरू होते आणि कळसूबाई शिखरावर संपतो. या ट्रेकिंगची लांबी सुमारे 6.6 किमी आहे. पावसाळ्यात या ट्रेकिंगचे सौंदर्य अप्रतिम असते, त्यामुळे पावसाळ्यात दररोज हजारो लोक येथे पोहोचतात. मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये रात्रीचे कॅम्पिंग देखील येथे होते.




सिंहगड किल्ला - आश्चर्यकारक आणि मनमोहक दृश्य


महाराष्ट्रातील पुणे शहर अनेक आश्चर्यकारक आणि मनमोहक ठिकाणांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या सुंदर शहरात असलेल्या सिंहगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अनेक ट्रेकर्स गर्दी करतात. हा किल्ला त्याच्या सौंदर्यासाठी आणि अप्रतिम दृश्यांसाठी खूप लोकप्रिय आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेला सिंहगड किल्ला पुण्याच्या डोणजे गावातून सुरू होतो. या ट्रेकिंग दरम्यान, सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्ये जवळून पाहता येतात. पावसाळ्यात या ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. पावसाळ्यात तुम्हाला सर्वत्र हिरवळ आणि धबधब्यांची अप्रतिम दृश्ये पाहायला मिळतील.




विकटगड ट्रेक - एक ऐतिहासिक स्थळ


महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून 19 किमी अंतरावर असलेला विकटगड किल्ला एक ऐतिहासिक स्थळ तसेच एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. विकटगड जसे ऐतिहासिक तथ्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे येथील ट्रेकिंग देखील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. लहान-मोठे खडक, मैदाने आणि खडबडीत मार्गातून वाट काढत विकटगड किल्ल्यावर पोहोचणे हे कोणत्याही पर्यटकासाठी एक मजेशीर एक्टीव्हिटी आहे. विकटगड ट्रेकिंगचे सौंदर्य पावसाळ्यात अप्रतिम असते. त्यामुळे दर पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येतात.


 


हेही वाचा>>>


Travel : पावसाळ्यात 'इथे' जणू स्वर्गच अवतरतो! महाराष्ट्रातील भगवान शंकराचे 'असे' ठिकाण, जे सह्याद्रीच्या कुशीत वसलंय


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )