Shani Jayanti 2024 : शनीला (Shani Dev) कर्मफळदाता असं म्हणतात. कर्माचा देवता असलेल्या शनीला (Lord Shani) उपासना शास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे. असं म्हणतात की, शनीचा ज्या लोकांना आशीर्वाद मिळतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. जर, तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल आणि शनीचा प्रभाव जर तुम्हाला टाळायचा असेल तर येत्या 6 जून रोजी म्हणजेच शनी जयंतीच्या (Shani Jayanti) दिवशी विधीनुसार शनीची पूजा करा.


शनीला फक्त काळ्या वस्तूच अर्पण केल्या जातात हे सामान्यतः लोकांना माहीत असतं पण तसं नाहीय. शनीच्या पूजेमध्ये अनेक साहित्याचा वापर केला जातो. या पूजेच्या साहित्यात नेमक्या कोणत्या वस्तू असाव्यात ते जाणून घेऊयात.


शनी जयंतीच्या पूजेच्या साहित्याची यादी :  



  • मोहरीचे तेल, काळे किंवा निळे कपडे, निळी फुले

  • तिळाचे तेल, काळे तीळ, गुग्गल, दिवा

  • शमीची पाने, अपराजिता फुले, मिठाई

  • तेलात बनवलेल्या पुरी, शनी यंत्र, लवंग, काळी उडीद

  • नारळ, कुमारिका, गंगेचे पाणी


सप्तधान्य - मूग, जव, गहू, तीळ, उडीद, हरभरा (सप्तधान्य शनीला काळ्या वस्तूंशिवाय या वस्तू प्रिय आहेत. ते अर्पण करणाऱ्यांवर शनी वाईट नजर टाकत नाही.)


शनीची पूजा कोणत्या वेळी करावी? 


सूर्यास्तानंतर शनीची पूजा केली जाते. शास्त्रानुसार शनी सूर्योदयाच्या वेळी पूजा स्वीकारत नाहीत, कारण शनी हा सूर्याचा पुत्र नक्कीच आहे पण दोघेही एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे ही वेळ नक्की पाळावी. 


शनीची पूजा कोणत्या दिशेला करावी? 


शास्त्रानुसार पश्चिम दिशेचा स्वामी शनी मानला जातो आणि तो याच दिशेला वास करतो. पूर्वेकडे तोंड करून शनीची पूजा करू नये, कारण ही सूर्याची दिशा आहे आणि शनीची पाठ याच दिशेला आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; तूळसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ, धन-संपत्तीत होणार वाढ