Travel : भारताला मंदिरांचे माहेर म्हटलेलंच आहे. पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर भारतात अशी असंख्य मंदिरं आहेत, जिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हिंदू धर्मातच म्हटलेलंच आहे.. भगवान शिव सर्वांचे रक्षक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे खुद्द भगवान शिव प्रकट झाले असल्याचा पुराणात उल्लेख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपल्या मनोकामना घेऊन या शिवमंदिरात पोहोचतात. जाणून घेऊया या अद्भूत मंदिराबद्दल..



या मंदिरातच भगवान शिवाचे दर्शन झाले होते...


महादेवाचं हे मंदिर हे देशातील असेच एक मंदिर आहे, ज्याबद्दल असे म्हटले जाते की या महादेवाच्या मंदिरातच भगवान शिवाचे दर्शन झाले होते. आणि ते मंदिर आहे नर्मदेश्वर मंदिर. या लेखात आम्ही तुम्हाला नर्मदेश्वर महादेव मंदिराविषयी सांगणार आहोत.


 


नर्मदेश्वर महादेव मंदिर कोठे आहे?


नर्मदेश्वर महादेव मंदिराची पौराणिक कथा जाणून घेण्यापूर्वी हे पवित्र आणि प्राचीन मंदिर देशाच्या कोणत्या भागात आहे? ते जाणून घेऊया. तुमच्या माहितीसाठी योगनगरी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या ऋषिकेशमध्ये नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे. नर्मदेश्वर महादेव मंदिर ऋषिकेशमधील त्रिवेणी घाटाजवळ गंगा नदीच्या काठावर आहे. हे मंदिर या शहरातील सर्वात पवित्र आणि प्राचीन मंदिर मानले जाते. या मंदिराला नर्मदेश्वर लाल मंदिर म्हणूनही ओळखले जाते.



नर्मदेश्वर महादेव मंदिराची पौराणिक कथा


नर्मदेश्वर महादेव मंदिराची पौराणिक कथा अतिशय मनोरंजक आणि धार्मिक आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की येथे स्थापित केलेले शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे. पौराणिक मान्यतेनुसार या शिवलिंगातून नर्मदा नदी उगम पावते. नर्मदेश्वर महादेव मंदिरात बसवलेल्या शिवलिंगाबाबत असे मानले जाते की, ओंकारेश्वरजवळील धवडी कुंडातून हे शिवलिंग प्रकट झाले आहे, ज्यामध्ये नर्मदेचा वास आहे, म्हणून ते नर्मदेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते.


 


..त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात


महाशिवरात्रीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक नर्मदेश्वर महादेव मंदिरात येतात. या विशेष प्रसंगी मंदिराला सजवण्यात येते. नर्मदेश्वर महादेव मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की, जो कोणी भाविक येथे खऱ्या मनाने येऊन शिवलिंगावर जलाभिषेक करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातही येथे भाविकांची गर्दी असते.



नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या आसपास पाहण्यासारखी ठिकाणे


नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या आजूबाजूला अनेक पवित्र आणि लोकप्रिय धार्मिक स्थळे आहेत, जी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तुम्ही त्रिवेणी घाट, लक्ष्मण झुला, परमार्थ निकेतन, नीलकंठ महादेव मंदिर आणि राम झुला यासारखी उत्तम ठिकाणे शोधू शकता. नर्मदेश्वर महादेव मंदिराला भेट देण्याबरोबरच ऋषिकेशमधील प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याबरोबरच तुम्ही साहसी उपक्रमांचाही आनंद घेऊ शकता. इथे रिव्हर राफ्टिंग करायला विसरू नका.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना बनवा धार्मिक, संस्कारी! भारतीय रेल्वेचे भारी पॅकेज, कमी बजेटमध्ये फिरा ही धार्मिक ठिकाणं