Travel : हिंदू धर्मात संस्काराला खूप महत्त्व दिले जाते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना धार्मिक आणि संस्काराचे धडे मिळाले तर याहून चांगली गोष्ट आईवडिलांसाठी काय असेल.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, लोक हिल स्टेशन, समुद्र किनारी किंवा इतर ठिकाणी पिकनिकसाठी जातात आणि त्यांच्या कुटुंबासह मजा करून परत जातात. मात्र आता मे महिन्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना देव, धर्माची आवड निर्माण करण्यासाठी एक चांगली संधी आहे, कारण भारतीय रेल्वेने एक असे पॅकेज आणले आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही कमी बजेटमध्ये आपल्या मुलांना विविध धार्मिक ठिकाणं फिरवू शकता. 


 


उन्हाळ्याच्या सुटीत मोठी संधी 


आपल्या मुलाने सुसंस्कृत, विश्वासू आणि नैतिक मूल्ये विकसित करावीत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. अशा पालकांना उन्हाळ्याच्या सुटीत मोठी संधी मिळणार आहे, त्यासाठी आतापासून तयारी करा. ही खास संधी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आणली आहे. हे खरे आहे. ही संधी काय आहे ते जाणून घेऊया. IRCTC या सुट्ट्यांसाठी एक विशेष पॅकेज घेऊन आले आहे, ज्यामध्ये नद्या आणि पर्वतांसह देशातील प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.


 


लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे पॅकेज


भारतीय रेल्वेचे हे पॅकेज असे आहे की त्यात नद्या, पर्वत आणि धार्मिक स्थळांचा समावेश आहे. यामुळे, मुले आणि त्यांचे आजी-आजोबा सर्वजण या टूरमध्ये सहभागी होऊ शकतात. हरिद्वार आणि ऋषिकेश, जिथे नद्या आणि धार्मिक स्थळे सापडतील. मथुरा, वंदवन आणि अयोध्या ही देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. माता वैष्णोदेवीच्या दर्शनात पर्वत आणि धर्म या दोन्हींचा समावेश असेल.



मनःशांतीसह प्रवासाचा आनंद घ्या.. पॅकेजमध्ये 33 टक्के सूट 


या पॅकेजचे भाडे सुमारे 2000 रुपये प्रतिदिन आहे. आठ रात्री आणि नऊ दिवसांसाठी (18 ते 26 मे पर्यंत) पॅकेज 17900 रुपये आहे. रेल्वेने प्रवासाव्यतिरिक्त, यात नाश्ता, दुपारचे जेवण, निवास आणि स्थानिक वाहतूक यांचा समावेश आहे. या पॅकेज व्दारे तुम्ही मनःशांतीसह प्रवासाचा आनंद घेऊ शकता. ही संपूर्ण ट्रेन स्लीपर असेल. या पॅकेजमध्ये सामान्य दरांच्या तुलनेत 33 टक्के सूट दिली जात आहे. बहुतेक राज्यातील लोक या पॅकेजचा लाभ घेऊ शकतात, कारण या प्रवासादरम्यान, मुले गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र सुट्टीवर असतील. साधारणपणे उत्तर भारतात जूनपर्यंत सुट्ट्या सुरू असतात, पण गुजरात-महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होतात.


 


अशी बुकींग करा


लोकांच्या सोयीसाठी IRCTC ने घरबसल्या बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर क्लिक करून लोक बुकींग करू शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास ती तुम्हाला या लिंकवर मिळेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहून पाठवावा लागेल.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : 'स्वित्झर्लंड, पॅरिस विसरा..लाखो पैसे वाचवा..भारतातच हनिमून एन्जॉय करा..!' 'ही' ठिकाणं इतर देशांपेक्षाही Best!