Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : काँग्रेसचे नेते बाळासाहेब  थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे, ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाहीत, पक्षाच्या धोरणावर बोलत नाहीत, त्यांचा संपूर्ण वेळ हा विखेंवर टीका करण्यात खर्च होत असल्याचे विखे पाटील म्हणाले.  


नेमकं काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?


बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टिकेला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खेडकर यांच्या प्रचारासाठी नगरला आले होते. त्यावेळेस त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची गुपित भेट झाली असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याविषयी  बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील हा विषय माझ्या कानावर आला असून, विखे यांची काँग्रेसकडे येण्यासाठी  धडपड चालू असल्याचे म्हटले होते. त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


 बाळासाहेब यांची देखील भाजपमध्ये येण्याची इच्छा होती


बाळासाहेब  थोरात यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाहीत, पक्षाच्या धोरणावर बोलत नाहीत, त्यांचा संपूर्ण वेळ हा विखेंवर टीका करण्यात खर्च होत आहे. उत्तर महाराष्ट्रात तुम्ही फक्त एक जागा लढवत आहात, ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करतात त्या जिल्ह्यात एकही जागा तुम्ही लढवत नाही असेही विखे पाटील म्हणाले. आपलं अपयश एकदा मान्य करा असेही विखे पाटील म्हणाले. बाळासाहेब यांची देखील भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. त्यांच्याही गुप्त बैठका झाल्या होत्या. ती चर्चा का थांबली हे वरिष्ठांना विचारून मी कधीतरी जाहीर करेल असे विखे पाटील म्हणाले. 


अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढत ही देखील प्रतिष्ठेची मानली जातेय. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके निवडणूक लढवत आहेत. 7 मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळं आता जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Prakash Ambedkar: विखे-पाटील पितापुत्र गुप्तपणे दिल्लीत मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट