Travel : जर तुम्हाला तुमचा मधुचंद्र (Honeymoon) म्हणजेच हनीमून अविस्मरणीय करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगत आहोत. जिथे तुम्ही गेल्यावर तुमची हनी अगदी खूश होईल, सोबतच ट्रीपही मस्त होईल. आणि जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी परदेशात फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. या ठिकाणी कमी बजेटमध्ये 1 आठवड्यासाठी ट्रीप प्लॅन केली जाऊ शकते.
'या' प्रसिद्ध बेटांवर अनेक प्रसिद्ध गाणी शूट करण्यात आली!
आपण जेव्हा बॉलीवूडची गाणी पाहतो, तेव्हा त्या गाण्यांसोबत त्यांचे लोकेशन पाहूनही आपले मन भारावून जाते. इतके भारी लोकेशन्स असतात की आपल्यालाही जर तिथे जाता आले असते तर.. असे विचार मनात येतात. बॉलीवूडची गाणी उत्कृष्ट बनवण्यासाठी कलाकारांचा अभिनयच नाही तर लोकेशन देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे निर्माते फक्त एका गाण्याच्या शूटिंगसाठी परदेशात जाण्याचा बेत आखतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध बेटांबद्दल सांगणार आहोत, जिथे अनेक प्रसिद्ध गाणी शूट करण्यात आली आहेत. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कुठेतरी हनिमून ट्रिपचा प्लान करत असाल तर तुम्ही इथे जाऊ शकता. सुंदर दृश्यांसोबतच तुमचे फोटोही सुंदर दिसतील आणि तुमची ट्रीपही रोमँटिक होईल.
माजोर्का बेट, स्पेन
2023 मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे ऐकले नसेल असा क्वचितच कोणी असेल. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानचे हे गाणे स्पेन आणि माजोर्का बेटावर अनेक प्रसिद्ध ठिकाणी शूट करण्यात आले.
जोकुलसरलों, आइसलँड
'दिलवाले' चित्रपटातील गेरुआ हे गाणे युरोपमधील आइसलँडमध्ये शूट करण्यात आले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गाण्याचे संपूर्ण शूटिंग आइसलँडमध्ये झाले आहे. गाण्यातील काही दृश्यांमध्ये, तुम्हाला जोकुलसरलों, स्कोगाफॉसचे दृश्य पाहायला मिळतील. हनिमून डेस्टिनेशनसाठी जोडप्यांना हे ठिकाण आवडेल.
खाओ फिंग कान, क्राबी
हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटातील अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेले कहो ना प्यार है हे गाणे दक्षिण थायलंडमधील क्राबी बेटावरील जेम्स बाँड आयलंडजवळ चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाची अनेक दृश्ये येथे शूट करण्यात आली आहेत.
सेशेल्स, आफ्रिका
'रॉकी हँडसम' चित्रपटातील रहनुमा गाण्यात दिसणारे सुंदर दृश्य आफ्रिकेतील सेशेल्स बेटाचे आहे. जॉन अब्राहम आणि श्रुती हासन यांच्या रोमँटिक गाण्यांच्या सुंदर लोकेशन्सला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. तुम्ही तुमच्या हनिमून ट्रिपची योजनाही येथे करू शकता.
सँटोरिनी
हृतिक रोशन आणि कतरिना कैफचे मेहेरबान हे गाणंही परदेशात शूट झाले आहे. सँटोरिनच्या सुंदर बेटाचे दृश्य चित्रपटात पाहता येईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Travel : भर उन्हात टेन्शन विसराल! जेव्हा 'या' थंडगार धबधब्याचं स्वर्गसुख अनुभवाल.. एकदा भेट देऊन तर बघा...