पुणे : तृतीयपंथीयांवर (Transgender) पुणे पोलिसांकडून (Pune Police) निर्बंध घालण्यात आले आहे. तृतीयपंथींना आता सिग्नलवर पैसे मागता येणार नाही आहे.  दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.


तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या मात्र पुणे पोलिसांनी या पूर्वी या तक्रारींकडे फार लक्ष दिलं नाही. आता मात्र तक्रारींंचं प्रमाण चांगलंच वाढलं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.  सिग्नलवर उभे असलेल्या वाहनांना जर त्रास दिला तर या तृतीयपंथीवर होणार कारवाई होणार आहे, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. 


त्यासोबतच घरगुती समारंभमध्येदेखील आमंत्रणशिवाय हजेरी लावण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अमितेश कुमार यांनी सांगितलं की, शहरातील अनेक सिग्नलवर तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात. अनेकदा पैसे मागण्यासाठी तृतीयपंथी वाहन चालकांकडे जबरदस्ती करताना दिसतात. यातून वादाचे प्रकार होऊन इतर वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशातच पुणे पोलिसांनी तृतीयपंथीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये यापुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत. पोलिसांनी तृतीयपंथींवर काही निर्बंध लादले असून याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार आहे. 


शहरात शिस्त राहण्यासाठी मोठा निर्णय 


पुण्यात अनेक सिग्नलवर तृतीयपंथी उभे राहून पैसे मागत असतात. परिणामी सामान्य जनतेला त्रास देत असतात. त्यामुळे अनेक पुणेकर नागरिक या तृतीयपंथीयांमुळे त्रस्त असल्याचं दिसून आलं. अनेक पुणेकरांनी यासंदर्भात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या मात्र त्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नव्हती. अखेर अमितेश कुमार यांनी या तक्रारींची दखल घेतली आणि त्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहे. शहराला शिस्त लागण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. 


धार्मिक कार्यावर निर्बंध


साधारण हेच तृतीयपंथी अनेक धार्मिक कार्यक्रमांनादेखील जबरदस्तीने हजेरी लावतात आणि तिथे पैसे मागताना दिसतात. त्यामुळे धार्मिक कार्य सुरु असतानादेखील नागरिकांना तृतीयपंथीयांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे या कार्यक्रमावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांसाठी  राहुल गांधी, प्रियंका गांधींचे रोड शो तर महत्वाच्या नेत्यांच्या सभा; पुण्यात पुन्हा कसबा पॅटर्न चालणार?