Travel :  उन्हाळ्यातील उष्ण वातावरण, शहरातील वेगवान जीवन, ट्राफिकमुळे कंटाळवाणा प्रवास, कामाचा ताण, रोज रोज कंटाळा आला ना... काही काळासाठी या टेन्शनपासून फ्री टाईम मिळाला तर किती बरं होईल.. असा विचार जर तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यासाठी तुम्हाला रोजच्या कामातून थोडा ब्रेक घ्यावा लागेल, आणि स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर थोडा वेळही द्यावा लागेल, जेणेकरून तुम्ही पुन्हा फ्रेश माईंडने कामावर परताल.. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत (Summer) कुठे जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिमाचल प्रदेशला नक्की भेट दिली पाहिजे. कारण इथल्या धबधब्याखाली तुम्हाला पूर्ण आराम मिळेल. जर तुम्ही कुटुंब, मित्र आणि जोडीदारासह गेलात तर तुम्हाला याची आणखी मजा घेता येईल.


 


हिमाचल मधील धबधबे पाहणं अनेकांचं स्वप्न असतं..


हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रमुख राज्य तसेच एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे राज्य आपल्या निसर्ग सौंदर्य, अप्रतिम दृश्ये आणि आकर्षक ठिकाणांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे उंच पर्वत, घनदाट जंगले आणि मनमोहक दृश्ये हिमाचल प्रदेशच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे या इथे असलेले अनेक धबधबे देखील पर्यटकांचे मन मोहतात. हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये असे अनेक धबधबे आहेत, जे पाहणे अनेकांचे स्वप्न असते. या लेखात आम्ही तुम्हाला हिमाचलच्या काही न पाहिलेल्या धबधब्यांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या खाली तुम्हाला उष्णतेपासून नक्कीच आराम मिळेल.


 





भागसुनाग धबधबा


हिमाचल प्रदेशातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध धबधब्याचे नाव घेतले तर भागसुनाग धबधब्याचे नाव नक्कीच प्रथम येते. हा सुंदर धबधबा हिमाचलच्या मॅक्लिओडगंजपासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे. भागसुनाग धबधब्यात 30 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून पाणी कोसळते, तेव्हा आजूबाजूचे दृश्य नयनरम्य असते. हा धबधबा प्रसिद्ध आहे, कारण येथे अनेक लोक थंडगार सुख अनुभवण्यासाठी येतात. या धबधब्याचे खरे रूप पावसाळ्यात पाहायला मिळते.





चॅडविक फॉल्स


चॅडविक वॉटरफॉलचे सौंदर्य आणि लोकप्रियता इतकी लोकप्रिय आहे की, याला शिमल्याची शानही म्हटले जाते. शिमल्याच्या घनदाट जंगलांमध्ये वसलेले, समर हिल्सपासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून 1 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या चॅडविक फॉल्सवरून जेव्हा पाणी जमिनीवर पडते तेव्हा आजूबाजूचे दृश्य सर्वांनाच भुरळ घालते. हे शिमल्याच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. उन्हाळ्यात येथे अनेक लोक थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी येतात. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य खुलून दिसत असते.


 




राहला धबधबा


हिमाचल प्रदेशातील मनाली हे शहर इतके लोकप्रिय आहे की, येथे केवळ स्थानिकच नाही तर परदेशी पर्यटकही येतात. मनालीपासून हाकेच्या अंतरावर असलेला राहला धबधबा मनालीची शान मानला जातो. समुद्रसपाटीपासून 2 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेला राहला धबधबा हिमनदी वितळल्याने तयार झाला आहे. मनालीला भेट देण्यासाठी येणारा कोणताही पर्यटक राहला धबधब्याच्या सौंदर्याची नक्कीच प्रशंसा करतो. उन्हाळ्यात येथे पर्यटकांची संख्या अधिक असते.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


Travel : 'कुछ तुफानी करेंगे!' एप्रिलमध्ये 'एडवेंचर ट्रीप' करायचीय? फक्त 'हे' पॅकेज बुक करा, मित्रांसोबत करा 'हँग आउट...