Health : काही दिवसांपूर्वी एक बातमी आली. ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली, आणि याबाबत शंकेची पाल चुकचुकली. ती बातमी अशी होती की, Covishield या कोविड-19 लसीमुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. दरम्यान, याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. भारतीय डॉक्टरांचे मत काय आहे ते जाणून घेऊया.
कोविड-19 लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात?
ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने मान्य केले आहे की त्यांच्या कोविड-19 लसीमुळे काही दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. दरम्यान, कोविशील्ड लसीबाबतही लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने AstraZeneca सारखेच सूत्र वापरून Covishield लस तयार केली होती. ब्रिटीश मीडियानुसार, या कंपनीविरुद्ध 51 खटले प्रलंबित आहेत. इतकंच नाही तर अनेक प्रकरणं आहेत ज्यात लसीमुळे जीव गमवावा लागला आहे आणि अनेक लोक गंभीर आजारी पडले आहेत. याबाबत भारतीय डॉक्टरांचे मत काय आहे ते जाणून घेऊया.
लसीकरणाचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ - जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात..
दरम्यान, एस्ट्राझेनेका (AstraZeneca) ने याबाबत इंडिया टुडेशी संवाद साधला, त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'कोविड लस घेतल्यामुळे ज्यांनी आपले लोक गमावले आहेत किंवा ज्यांना यामुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्यासोबत आमची सहानुभूती आहे. रुग्णांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि लसींसह सर्व औषधांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्ट आणि कठोर मानके आहेत. तर चाचणीच्या आधारे, AstraZeneca-Oxford लसीने स्वतःला सुरक्षित असल्याचे सिद्ध केले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ असे सांगत आहेत की, लसीकरणाचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत, तर फायदे या दुष्परिणामांपेक्षा कितीतरी जास्त आहेत.'
भारतीय डॉक्टर काय म्हणतात?
इंडिया टुडेने वृत्तसंस्थेने याबाबत भारतीय डॉक्टरांशी चर्चा केली, ज्यांनी साथीच्या रोगाचा बारकाईने अभ्यास केला आहे. घेतलेल्या मुलाखतीनुसार या विषयावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे? AstraZeneca कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की, कोविड लस घेत असलेल्या लोकांमध्ये दुर्मिळ दुष्परिणाम दिसून आले आहेत, यावर भारतीय डॉक्टरांना उत्तर दिलंय..
भारतीय डॉक्टर म्हणतात, हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, AstraZeneca ने न्यायालयात कबूल केले आहे की, Covishield आणि Vaxzevria या लसीमुळे TTS (थ्रॉम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम विथ थ्रोम्बोसिस) दुष्परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.
TTS म्हणजे काय?
भारतीय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार TTS ही एक दुर्मिळ स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात आणि रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन म्हणाले, 'ब्रिटनमधील न्यायालयीन कामकाजादरम्यान घडलेल्या या सर्व गोष्टी ब्रिटिश मीडियाने दिल्या आहेत. टीटीएस, लसीमुळे होणारा एक दुर्मिळ दुष्परिणाम, यावर आधीच चर्चा करण्यात आली आहे. WHO कडून मे 2021 मध्ये याबाबत एक अहवालही प्रकाशित करण्यात आला होता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>