IPL 2024 Latest Points Table: चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 7 विकेट्सने पराभव केला आहे. जॉनी बेअरस्टो आणि रिले रुसो यांच्या शानदार खेळीमुळे पंजाबने 13 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. पंजाबने गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले असून चेन्नई चौथ्या स्थानी कायम आहे.






चेन्नईविरुद्ध हैदराबादने विजय मिळवल्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. राजस्थानचा संघ अजूनही गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. राजस्थानने 9 सामन्यात 8 विजय मिळवले आहे. राजस्थानचे सध्या 16 गुण आहेत. कोलकाताचा संघ 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौता संघ 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईचे सध्या 10 गुण आहेत. 


हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने एकूण 9 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचे सध्या 10 गुण आहेत. दिल्लीचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 10 गुण आहेत. तर पंजाबचा संघ 8 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. गुजरातचा संघ 8 गुणांसह आठव्या क्रमांकावर, मुंबईचा संघ नवव्या, तर बंगळुरुचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. बंगळुरुचे 6 गुण आहेत.






ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गायकवाडने कोहलीला मागे टाकले-


चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार ऋतुराज गायकवाडने पंजाब किंग्जविरुद्ध 48 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली, ज्याच्या मदतीने त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गायकवाडने कोहलीला मागे टाकले. गायकवाडने 509 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहली या यादीत 500 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


पर्पल कॅपमध्ये शर्यतीत कोण?


सध्या मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 14 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजुर रहमान आणि पंजाब किंग्जचा हर्षल पटेल 14-14 विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.


संबंधित बातम्या:


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


Rohit Sharma Net Worth: रोहित शर्मा आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच भरपूर कमाई