Travel : ऑक्टोबरमध्ये तसं पाहायला गेलं तर ऊन असतं, ऑक्टोबर हिटच्या वाढत्या गरमीमुळे अनेक जण हैराण होतात. अशात जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये बाहेर फिरायचा प्लॅन करत असाल तर भारतीय रेल्वेकडून केरळ फिरण्याची संधी सोडू नका, कारण पावसाळा संपताच येथे फिरण्याचा मोसम सुरू होतो. त्यासाठी भारतीय रेल्वेकडून अगदी कमी बजेटमध्ये उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. जाणून घ्या सविस्तर...
हिरवळ.. स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे..
केरळचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करते. आजूबाजूला हिरवळ.. स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे.. अशा वातावरणात फिरायला कोणाला आवडणार नाही? हिवाळा हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानला जातो, त्यामुळे तुम्ही केरळला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये IRCTC सोबत योजना करू शकता. तुम्ही बजेटमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता. जर भारतातील भेट देण्याच्या ठिकाणांबद्दल बोललो तर या यादीत केरळचा नक्कीच समावेश आहे. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण केरळ हे केवळ हनिमून जोडप्यांसाठीच नाही तर साहसी आणि निसर्गप्रेमींसाठीही उत्तम ठिकाण आहे. पावसाळा संपताच येथे फिरण्याचा मोसम सुरू होतो. जर तुम्ही केरळला अजून एक्सप्लोर केले नसेल तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये प्लॅन करू शकता.
पॅकेजचे नाव- सेलेस्टियल केरळ टूर
पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास मोड- फ्लाइट
स्थानकं- कोची, कुमारकोम, मुन्नार, थेक्कडी
तुम्हाला 'या' सुविधा मिळतील
तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइट तिकिटे मिळतील.
राहण्यासाठी थ्री स्टार हॉटेलची सोय असेल.
या टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरचा समावेश असेल.
या पॅकेजमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या सुविधेचाही समावेश आहे.
IRCTC ने ट्विट करून दिली माहिती
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला केरळची हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अशी बुकींग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास केल्यास तुम्हाला 54,300 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 41,300 रुपये मोजावे लागतील.
तीन जणांना प्रति व्यक्ती 40,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 36,100 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 31,900 रुपये द्यावे लागतील.
हेही वाचा>>>
Travel : पावसात कोकणातील राजापूरात येवा..! लोणावळा, खंडाळा विसराल, इथलं सौंदर्य तुम्हाला वेड लावेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )