Monsoon Travel : जून महिन्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. या ऋतूत देशासह महाराष्ट्रात निसर्ग फुलला, बहरला आहे. अशात कोणी लोणावळा..कोणी खंडाळा, तर कोणी महाबळेश्वर, कोणी माथेरान.. अशा विविध ठिकाणी निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायला जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कोकणातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही इतर ठिकाणं विसराल, सध्या कोकणातील राजापूर हे ठिकाण निसर्गसौंदर्याने बहरलं आहे. आज आम्ही तुम्हाला राजापूरच्या काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या..
देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक देतात भेट
महाराष्ट्र हे भारताचे असे राज्य आहे की, ते आपल्या संस्कृती, ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. लोणावळा, खंडाळा आणि महाबळेश्वर व्यतिरिक्त, हजारो लोक दररोज पाचगणी, माथेरान आणि इगतपुरी हिल स्टेशन सारख्या विविध ठिकाणांना भेट देतात. जुलै ते ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडतो, तेव्हा राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेटीसाठी येतात, कारण पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे अतिशय सुंदर होतात. महाराष्ट्रातील राजापूर देखील एखाद्या सुंदर ठिकाणापेक्षा कमी नाही. अरबी समुद्र किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या या ठिकाणी दूरदूरवरून पर्यटक येतात. या लेखात आम्ही तुम्हाला राजापूरच्या काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
राजापूर गंगा धबधबा
राजापूरला भेट देण्याचा विचार केला तर राजापूर गंगा धबधब्याचे नाव नक्कीच प्रथम येते. लहान-मोठे पर्वत, घनदाट जंगलं आणि हिरवळीत लपलेला गंगा धबधबा अतिशय नयनरम्य दृश्य सादर करतो. गंगा धबधब्यात 30 फुटांपेक्षा जास्त उंचीवरून पाणी जमिनीवर पडलं की, नुसतं नजारा पाहिल्यासारखं वाटतं. पावसाळ्यात गंगा धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम असते. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये येथे सर्वाधिक पर्यटक येतात.
अर्जुन नदीचा पूल
राजापूरमध्ये अर्जुन नदी वाहते, जी पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसते. अशात जर तुम्हाला एकाच ठिकाणी थांबून निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहायचे असेल तर तुम्ही अर्जुन नदीच्या पुलावर पोहोचू शकता. मिळालेल्या माहितीनुसार हा पूल NH66 पासून थोड्या अंतरावर आहे. जर तुम्ही मुंबई ते गोव्याच्या रोड ट्रिपला जात असाल, तर तुम्ही आश्चर्यकारक दृश्य पाहण्यासाठी थांबू शकता. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही
धूतपापेश्वर मंदिर
धूतपापेश्वर मंदिर हे राजापूर तसेच महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. डोंगराच्या मधोमध वसलेले हे मंदिर, आणि त्याच्या आजूबाजूला अनेक अद्भुत दृश्यं पाहायला मिळतील. असे म्हणतात की, मंदिराच्या एका बाजूला जंगल आहे, मध्यभागी मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला एक सुंदर धबधबा आहे. जुलै-ऑगस्टमध्ये रिमझिम पाऊस पडतो, तेव्हा जंगल आणि धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ दिसते.
राजापूर पिन पॉइंट
राजापूर पिन पॉइंट हे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. राजापूर शहराचे सौंदर्य सहज पाहता येणारे हे ठिकाण मानले जाते. अर्जुन नदी आणि अर्जुन पूल याशिवाय पिन पॉइंटवरून राजापूरची हिरवळ जवळून पाहता येते. या सुंदर पिन पॉइंटजवळ उभे राहूनही तुम्ही संस्मरणीय फोटोग्राफी करू शकता. तुम्ही राजापूरहून ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
राजापूरला कसे जायचे?
-राजापूरला जाणे खूप सोपे आहे.
-राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक लहान आणि अतिशय सुंदर शहर आहे.
-हे महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहराशी जोडलेले आहे.
-देशाच्या कोणत्याही भागात रत्नागिरीला पोहोचल्यानंतर तुम्ही टॅक्सी, कॅब किंवा लोकल बसने सहज राजापूरला पोहोचू शकता.
-मुंबईहून NH66 महामार्गानेही पोहोचता येते.
-तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातून ट्रेनने राजापूर रेल्वे स्थानकावर पोहोचू शकता.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : 'येवा कोंकण आपलोच असा! तुम्ही कोकणातील 'या' धबधब्याखालून जाणारी रेल्वे पाहिलीय? पावसातील अप्रतिम दृश्य वेड लावेल..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )