Travel : सध्या देशासह विविध राज्यात मान्सूनचं आगमन झालंय. या मान्सूनमुळे चोहीकडे निसर्गराजा बहरलाय. अशात जर भारतातील दक्षिणेकडील भागाबद्दल बोलायचं झालं तर केरळच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण केरळला निसर्गाचं वरदान लाभलंय. मान्सूनचं आगमन झाल्यामुळे वातावरण आल्हाददायक झालंय. अशात मेट्रो सिटीत राहणाऱ्या लोकांनी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक घेतला पाहिजे, कारण कामाचा ताण, इतर जबाबदाऱ्यांमुळे माणूस स्वत:ला विसरत चाललाय. आज आम्ही तुम्हाला केरळमधील अशी काही ठिकाणं सांगणार आहोत, जी कमी लोकांना माहित असावीत, जिथे तुम्ही गेल्यानंतर तुमचा मूड फ्रेश होईल.


 


कमी गर्दी आणि निसर्गाचे सुंदर नजारे पाहाल..


केरळ हे भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. या स्वर्गीय भूमीत हिल स्टेशन्स, बॅकवॉटर, समुद्रकिनारे आणि वन्यजीव अभयारण्य यांसारखी अनेक ठिकाणे आहेत. केरळला भेट देण्यासाठी तुम्हाला वेगळे असे पर्यटन स्थळ पाहावे लागणार नाही, कारण संपूर्ण शहर तुमच्यासाठी आकर्षक असेल. ज्यांना प्रवासाची आवड आहे अशा लोकांना सहसा अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडते, ज्याबद्दल कोणालाही माहिती नसते. कारण या ठिकाणी तुम्हाला कमी गर्दी आणि निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतील. आज आम्ही तुम्हाला केरळमधील काही लपलेल्या ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे एकदा भेट दिली की, पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल.


 




कुट्टनाड - छायाचित्रकार आणि पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन 


कुट्टानाड हे कृषी क्षेत्रासाठी ओळखले जाते. ज्यामध्ये तांदूळ हे सर्वात महत्त्वाचे कृषी उत्पादन मानले जाते. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्कूटरवरून जरी फिरायला गेल्यास तुम्हाला निसर्गाचे अप्रतिम नजारा पाहायला मिळेल. छायाचित्रकार आणि पक्षी निरीक्षकांसाठी येथील गावे नंदनवन आहे. कुट्टनाडला केरळच्या तांदळाची वाटी म्हणतात. येथे तुम्ही विविध क्षेत्रातील लोकांशी बोलू शकता. या ठिकाणच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला लोकांकडून बरीच माहिती मिळेल.




वागमोन - देशातील सर्वात खास ठिकाणांपैकी एक 


पावसात तुम्हाला हे ठिकाण देशातील सर्वात खास ठिकाणांपैकी एक दिसेल. थंड हवामान, हिरवीगार झाडे, जोरदार वारा आणि तुमच्या जोडीदाराचा सहवास तुम्हाला खरोखर रोमँटिक वाटेल. केरळची लपलेली ठिकाणे बघायची असतील तर खेडोपाडी जायला हवे. येथे तुम्हाला शांत आणि स्वच्छ वातावरणासह सुंदर दृश्य पाहायला मिळेल. केरळमध्ये भेट देण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत.




पलाई गाव - जोडीदारासोबत एकांतात निसर्ग बघा



गर्दीपासून दूर असलेल्या ठिकाणी जोडीदारासोबत एकांतात निसर्ग बघायचा असेल तर या गावात जाऊ शकता. येथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा अप्रतिम नजारा पाहायला मिळेल. हे गाव मीनाचिल नदीच्या काठावर वसलेले आहे. तुम्ही स्कूटी किंवा बाईकवर असाल तर तुम्ही फिरायला येऊ शकता. तथापि, येथे येण्यासाठी तुम्ही वेळेवर निघून जावे, कारण तुम्हाला हॉटेल मिळण्यास त्रास होऊ शकतो.


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळ्याला Weekend ट्रिपसाठी जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )