Monsoon Travel : सध्या पावसामुळे महाराष्ट्र कसा बहरून आला आहे, निसर्गप्रेमींनी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी विविध प्लॅन्सही केले असतील, रोज कामाचा ताण, इतर जबाबदाऱ्यांमुळे आठवड्याचे 5-6 दिवस कसे निघून जातात कळत नाही, एकदा का शनिवार-रविवार म्हणजेच विकेंड आला की मूड अगदी फ्रेश होतो. कारण बाहेर पावसामुळे वातावरण आल्हाददायक झालेलं असतं, या पावसात मनमुराद भिजून ओलचिंब होत नाही, तो पर्यंत ती पावसाळी ट्रिप म्हणता येणार नाही.. तर ज्यांना केवळ निसर्गसौंदर्याची अनुभूती घ्यायची असते, ते सु्दधा विकेंडला घरातून बाहेर पडून निसर्गरम्य ठिकाणी जातात. आजकाल पावसाळा म्हटलं की पुणे-मुंबईपासून जवळ असलेले हिल स्टेशन म्हणजे लोणावळा किंवा खंडाळा या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. कारण लोणावळ्याला भेट देण्याची खरी मजा पावसाळ्यातच असते. ढगांमध्ये या ठिकाणाचे सौंदर्य आणखीनच वाढते. पण सध्या या ठिकाणी विकेंडला जाणं म्हणजे डोकेदुखी ठरू शकते, जर तुम्हीही पावसाळ्यात लोणावळ्यात ट्रिपसाठी जात असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 



मान्सून आणि लोणावळा हे एक समीकरणच बनलंय


पाऊसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी मान्सून आणि लोणावळा हे जणू एक समीकरणच बनलंय आहे. लोणावळ्याला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जून ते सप्टेंबर म्हणजे पावसाळा. पावसाळ्यात पावसाच्या आगमनाने लोणावळ्यातील हिल स्टेशनचे आकर्षण अधिकच वाढले आहे. लोणावळ्यातील हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे महाराष्ट्रातील लोकांसाठी, विशेषतः शहरवासीयांसाठी पावसाळा हा सर्वात आवडता ऋतू आहे. पहिला पाऊस पडताच मुंबईकर, पुणेकर आणि आजूबाजूच्या शहरातील लोक निसर्गाच्या कुशीत निवांत विकेंड घालवण्यासाठी, तसेच ताज्या पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात गर्दी करतात. त्यामुळे या पावसाळ्यात तुम्हीही लोणावळ्याला जाण्याचा विचार करत असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची लोणावळा सहल आणखीनच संस्मरणीय होईल.




लोणावळ्यात करू नये 'अशा' गोष्टी


-सुरक्षित आणि आनंददायी सहलीसाठी लोणावळ्यात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे,  जेणेकरून पर्यटकांना कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्यापैकी एक म्हणजे, गर्दी होते अशा पर्यटन स्थळांपासून दूर राहा, जिथे जास्त लोकांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाणे टाळा. जसे - टायगर्स लीप, भुशी डॅम, ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत ,जिथे पर्यटकांची खूप वर्दळ असते. याशिवाय, तुम्ही काही न पाहिलेल्या ठिकाणांकडे जाऊ शकता.


 


-पावसाळ्यात प्रवास करण्यापूर्वी, मोठ्या जोखमींसाठी स्वतःला तयार करणे, तसेच धोक्याची शिफारस केलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळणे महत्त्वाचे आहे. लोणावळ्यातील भूस्खलन क्षेत्रापासून दूर राहा आणि निसरड्या रस्त्यावर सावधपणे वाहन चालवा.


 


-तसेच विना परवाना साहसी उपक्रम करण्यास पूर्णपणे नकार द्या. हे असुरक्षित आणि प्राणघातक असू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे जर लोणावळ्यात तुम्हाला साहसी उपक्रम किंवा अॅक्टीव्हीटीज करायच्या असतील तर, फक्त अशा ठिकाणीच करा, जे परवानाधारक आणि सुरक्षित आहेत.


 


या ठिकाणांनाही एकदा भेट द्या..


कुणे फॉल्स
विसापूर किल्ला
तुंगार्ली तलाव आणि धरण
वलवण धरण


 




लोणावळ्यातील 'या' ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या 


भुशी धरण क्षेत्र
टायगर्स लीप
ॲम्बी व्हॅली रोड
खंडाळा घाट विभाग
राजमाची किल्ला परिसर
कार्ला आणि भाजा लेणीकडे जाणारे रस्ते


हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची निवड करताना..


जर तुम्ही लोणावळ्यात राहण्यासाठी हॉटेल्स किंवा खाण्यासाठी रेस्टॉरंट शोधत असाल, तर गूगल किंवा स्थानिक रहिवाश्यांकडून रेटींग घेऊनच संशोधन करा आणि तेथे जाणे टाळा. ज्यामुळे तुम्हाला वाईट अनुभव येणार नाही. प्रवासादरम्यान हॉटेल आणि रेस्टॉरंटची चुकीची निवड देखील तुम्हाला वाईट आठवणी देऊ शकतात.



'या' भागात विनापरवाना जाऊ नका


पवना तलाव
ड्यूक नाक
कोरीगड किल्ला
साहसी खेळांसाठी फक्त परवानाधारक आणि प्रतिष्ठित ऑपरेटर निवडा.
सुरक्षित राहून पावसाळ्यात लोणावळ्याच्या प्रसन्न सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी वरील टिप्स फॉलो करा.


 


हेही वाचा>>>


Travel : 'मुंज्या' चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील 'ते' सुंदर गाव! मान्सून पिकनिकसाठी Best ऑप्शन, कलाकरांनाही भुरळ


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )