Travel : ते म्हणतात ना.. शिर्डीच्या साईबाबांचं बोलावणं आलं की, तुम्हाला त्यांच्या भेटीपासून कोणी अडवू शकत नाही. जर तुम्ही खूप दिवसांपासून शिर्डीला भेट देण्याचा विचार करत असाल, पण काही कारणांमुळे तुम्हाला शिर्डीला जाता आले नाही, तर भारतीय रेल्वे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही इथे प्रवास करू शकता. पावसाळ्यात मुंबई आणि आसपासची ठिकाणं अधिक सुंदर होतात. लोणावळा, खंडाळा सारखी ठिकाणे पाहण्यासाठी आहेत, परंतु जर तुम्ही शिर्डी साईंना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या काळात येथेही प्लॅन करू शकता. IRCTC ने नुकतेच टूर पॅकेज लाँच केले आहे. 4 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊ शकता. पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.


 


पॅकेजचे नाव- साई शिवम


पॅकेज कालावधी- 3 रात्री आणि 4 दिवस


प्रवास मोड- ट्रेन


डेस्टीनेशन - शिर्डी


 






 


IRCTC ने ट्विट करून माहिती दिली


IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला शिर्डीला जायचे असेल तर IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता असे म्हटले आहे. तुम्ही हे पॅकेज IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. IRCTC ने या टूर पॅकेजची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.


 


या सुविधा उपलब्ध होणार


प्रवासासाठी, तुम्हाला स्लीपर आणि 3AC क्लास ट्रेनची तिकिटे मिळतील.


या टूर पॅकेजमध्ये नाश्त्याची सुविधा उपलब्ध असेल.


प्रवास विम्याची सुविधाही उपलब्ध असेल.


प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल


या ट्रिपमध्ये तुम्ही 3AC तिकिटावर एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 9,320 रुपये मोजावे लागतील.


तर दोन लोकांसाठी 7,960 रुपये प्रति व्यक्ती शुल्क भरावे लागेल.


तीन लोकांना प्रति व्यक्ती 7,940 रुपये शुल्क भरावे लागेल.


मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.


बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 7,835 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 6,845 रुपये द्यावे लागतील.


 


तुम्ही अशी बुकिंग करू शकता


तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळ्याला Weekend ट्रिपसाठी जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )