Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत जर तुम्हाला कुटुंबासह कमी खर्चात नेपाळला जायची संधी मिळाली तर... तुम्हाला किती आनंद होईल.. पण हे खरंय.. कारण भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC तर्फे पर्यटकांसाठी अत्यंत स्वस्त दरात देशी आणि विदेशी टूरचे नियोजन केले आहे. यंदा IRCTC ने दिल्ली ते नेपाळ टूर पॅकेज सादर केले आहे. ज्यामध्ये पर्यटक काठमांडू आणि पोखराला भेट देतील. या टूर पॅकेज बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या..
दिल्ली ते नेपाळ टूर पॅकेज..!
भारतीय रेल्वे IRCTC ने पर्यटकांसाठी दिल्ली ते नेपाळ टूर पॅकेज सादर केले आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून पर्यटक नेपाळमध्ये जाऊन पर्यटकांना तिथल्या विविध ठिकाणांना भेटी देता येणार आहे. या टूर पॅकेजचा प्रवास विमानाने असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की IRCTC देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी टूर पॅकेजेस ऑफर करत आहे. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटक स्वस्तात आणि सोयीनुसार प्रवास करतात. IRCTC च्या नेपाळ टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती द्या.
एकूण 30 जागा, 15 जूनपासून प्रवास सुरू होईल
भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये एकूण 30 जागा आहेत. हे टूर पॅकेज 15 जूनपासून सुरू होणार आहे. तर दुसरे टूर पॅकेज 23 मे पासून सुरू होणार आहे. आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज मे आणि जूनमध्ये दोनदा नियोजन करण्यात येत आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांमा पोखरा आणि काठमांडूला भेट देता येणार आहे. पर्यटक दोन दिवस पोखरा आणि तीन दिवस काठमांडूला भेट देणार आहेत. आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांसाठी निवास आणि भोजन व्यवस्था मोफत असेल. पर्यटकांना नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल. बेस्ट ऑफ नेपाळ एक्स दिल्ली असे या टूर पॅकेजचे नाव आहे.
ते सगळं ठीक.. पण IRCTC च्या या टूर पॅकेजचे भाडे काय आहे?
IRCTC च्या या टूर पॅकेजच्या भाड्याबद्दल बोलायचं झालं तर... या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 45 हजार 500 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 37 हजार रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 36500 रुपये भाडे द्यावे लागेल. 2 ते 11 वयोगटातील मुलांचे भाडे 25600 रुपये ठेवण्यात आले आहे. पर्यटक अधिकृत वेबसाइटवरून IRCTC चे हे टूर पॅकेज बुक करू शकतात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : वेंकटरमणा गोविंदा! तिरुपती बालाजी दर्शनासाठी प्लॅन करताय? भारतीय रेल्वेचे सर्वात स्वस्त 3 पॅकेज एकदा पाहाच...