Chaitra Navratri 2024 Horoscope Today 15 April 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज, सोमवार, 15 एप्रिल हा महत्त्वाचा दिवस आहे. आज चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) सातवा दिवस, ही तिथी सप्तमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी देवी दुर्गेची सातवी शक्ती कालरात्रीची पूजा केली जाते. आज दिवसभर पुनर्वसु नक्षत्र राहील, तर सकाळी 7:32 ते 09:09 पर्यंत राहू काळ राहील, त्यानुसार सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार नेमका कसा राहील ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस काही समस्यांनी भरलेला असेल. काही कामाबाबत तुमचं मन चिंतेत राहील. व्यवसायात नुकसानही होऊ शकतं, भागीदारासोबत सावध राहा, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
वृषभ रास (Taurus)
आज तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचं असेल तर दिवस उत्तम आहे. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. मोठी भागीदारी केल्याने तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होईल. तब्येत ठीक राहील. तसेच आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मिळू शकतो.
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्ही अध्यात्माने परिपूर्ण असाल. मन प्रसन्न राहील. नियोजित कामं पूर्ण होतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मंदिरात वैगेरे जाऊ शकता. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदारी सुरू होईल. कुटुंबातील व्यक्तींकडूनही तुम्हाला सहकार्य मिळेल.
कर्क रास (Cancer)
आज तुमचं मन अस्वस्थ राहू शकतं. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात नुकसान होऊ शकतं. नोकरीशी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांशी वाद न घालण्याचा सल्ला दिला जातो. आज कुटुंबात काही जुना वाद समोर येऊ शकतो, तसेच पत्नीची तब्येत बिघडू शकते.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला व्यवसायात चांगली ऑफर किंवा डील देखील मिळू शकते. एखाद्या खास व्यक्तीला भेटावं लागेल. तुम्हाला कुटुंबातील सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल.
कन्या रास (Virgo)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. काही विशेष कामानिमित्त बाहेर लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. गाडी नीट चालवा. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक स्थिती खालावत जाईल. मन अस्वस्थ राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
तूळ रास (Libra)
आज तुम्ही अनावश्यक वादात अडकू शकता. तुमचं मन अशांत राहील. तुम्ही तुमच्या विरोधकांच्या काही षड्यंत्राचे बळी होऊ शकता. विरोधकांपासून सावध राहा. आर्थिक स्थिती खालावत जाईल. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबात मतभेद होऊ शकतात. गाडी चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक रास (Scorpio)
आज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमचं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात आज तुमचं नुकसान होऊ शकतं. नोकरी बदलणं तुमच्या हिताचं ठरणार नाही. तुमच्या पत्नीशी आज चांगले संबंध ठेवा.
धनु रास (Sagittarius)
आज तुमचं आरोग्य बिघडू शकतं, तुम्ही काही षड्यंत्राचे बळी पडू शकता. व्यवसायात नुकसान सहन करावं लागेल. जर तुम्हाला कोणतंही नवीन काम सुरू करायचे असेल तर ही वेळ योग्य नाही. कुटुंबात मालमत्तेबाबत वाद होऊ शकतात. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.
मकर रास (Capricorn)
आज तुमचं मन अस्वस्थ राहील. लांबच्या प्रवासाला जाणं टाळा. व्यवसायात आज कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. तसेच आज तुमच्या कामाची जागा बदलणं तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. कुटुंबातील लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. नियोजित कामं पूर्ण होतील. गाडी वैगेरे वापरताना काळजी घ्या. हवामानामुळे आरोग्यास थोडा त्रास होऊ शकतो. व्यवसायात मोठं यश मिळू शकतं. यासोबतच कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces)
आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. पैशांबाबत तुमचा तुमच्या मित्राशी वाद होऊ शकतो, ज्यामुळे परस्पर मतभेदाची परिस्थिती निर्माण होईल. आरोग्यातही उतार जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमचं काही नुकसान होऊ शकतं. याशिवाय काही गोष्टींवरुन कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: