Travel : बँकॉक.. पट्टाया... थायलंड! अनेकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी फॉरेनला जायचंच.. त्यासाठी मग लोक पैसे जमवायला सुरूवात करतात. जर तुम्हीही परदेशात जाण्याचा विचार करत असाल, परंतु बजेटमुळे तुमचा प्लॅन रद्द होत असेल, तर IRCTC ने तुमच्यासाठी अगदी कमी बजेटमध्ये परदेश प्रवास करण्याची संधी आणली आहे. फक्त 50,000 रुपयांमध्ये तुम्ही सुंदर थायलंड एक्सप्लोर करू शकता. जुलैमध्ये तुम्ही या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. राहण्यापासून ते जेवणापर्यंत, तसेच इतर अनेक सुविधांचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.



भारतीय रेल्वे तुमचं परदेशवारीचं स्वप्न करणार साकार..!


थायलंड हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुमच्या जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत येथे जाता येईल, परंतु बजेटमुळे काहीवेळा तुमचा प्लॅन पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हीही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे प्लॅनिंग पुढे ढकलत असाल, तर आता ही खरी वेळ आहे, जेव्हा तुम्ही थायलंडला जाण्याची योजना आखू शकता, कारण IRCTC ने बजेटमध्ये हे ठिकाण एक्सप्लोर करण्याची संधी आणली आहे. फक्त 50,000 रुपयांमध्ये परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा.





पॅकेज कालावधी- 3 रात्री आणि 4 दिवस
प्रवास - फ्लाइट (विमान प्रवास)
कव्हर केलेले डेस्टीनेशन- बँकॉक, पट्टाया


IRCTC ने ट्विट करून माहिती दिली


IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला थायलंडचे सुंदर नजारे बघायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.


 






 


या सुविधा मिळणार 


तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासची तिकिटे मिळतील.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.


 


प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल


या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास केल्यास तुम्हाला 57,820 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 49,450 रुपये मोजावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 49,450 रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. 
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 47,440 रुपये द्यावे लागतील
तर बेडशिवाय तुम्हाला 42,420 रुपये द्यावे लागतील.


 


तुम्ही अशी बुकिंग करू शकता


तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळ्याला Weekend ट्रिपसाठी जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )