Travel : हिंदू धर्मात धार्मिक यात्रेला खूप महत्त्व आहे. तर देवीच्या भक्तांसाठी वैष्णव देवीच्या यात्रा ही अत्यंत पवित्र म्हटली जाते. धार्मिक यात्रांच्या यादीत वैष्णव देवी यात्रा खूप खास आहे. देवी मातेचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तुम्हालाही येथे दर्शन घ्यायचे असेल, परंतु अद्याप कोणताही प्लॅन बनवला नसेल, तर IRCTC तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आले आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. पॅकेजशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घ्या...
IRCTC तर्फे नुकतेच टूर पॅकेज लाँच
IRCTC ने नुकतेच टूर पॅकेज लाँच केले आहे, ज्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही वैष्णव देवीला भेट देऊ शकता. IRCTC तुम्हाला या टूर पॅकेजमध्ये निवास, भोजनापासून वाहतुकीपर्यंत जवळपास सर्व सुविधा देत आहे. 8 दिवसांची ही सहल तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये पूर्ण करू शकता.
पॅकेजचे नाव- Matarani Darshan with Patnitop
पॅकेज कालावधी- 7 रात्री आणि 8 दिवस
प्रवास मोड- ट्रेन
कव्हर केलेले डेस्टिनेशन- जम्मू, कटरा, वैष्णव देवी
या सुविधा उपलब्ध होणार
तुम्हाला प्रवासासाठी 3AC आरामदायी ट्रेन तिकीट मिळेल.
राहण्यासाठी डिलक्स हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 31,350 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 18,650 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 15,550 रुपये शुल्क द्यावे लागेल.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. बेडसह (5-11 वर्षे) तुम्हाला 8550 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला वैष्णव देवीचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अशी बुकिंग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र आणि क्षेत्रीय कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : वीकेंड खास ... ट्रीपही खास! लोणावळा, खंडाळाशिवाय पावसाळ्यात 'ही' ठिकाणं म्हणजे स्वर्गसुखच..! टेन्शन विसरून कराल एन्जॉय
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )