Monsoon Travel : बॉलीवूडचा 'मुंज्या' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. 7 जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'मुंजा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला लोक आजही भरभरून प्रेम देत आहेत. या चित्रपटाची पटकथा, कलाकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात दिसणारं सुंदर गाव... ज्याची चर्चा सर्वाधिक होत आहे. एखाद्या स्वप्नाप्रमाणे भासावं असे लोकेशन्स या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. ज्यामुळे रुपेरी पडद्यावर पाहताना या चित्रपटाचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच 35.3 कोटींची कमाई केली होती. लोकांना चित्रपटाची कथा सोबतच शूटिंग लोकेशन देखील खूप आवडले आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच गावांबद्दल सांगणार आहोत. जिथे मुंज्या चित्रपटाची शुटींग करण्यात आली. या चित्रपटातील कलाकारांनाही या गावांची भूरळ पडल्याचं त्यांच्या मुलाखतीतून अनेकदा सांगतात. जाणून घ्या..


 


मुंज्या चित्रपटातील दाखवल्या जाणाऱ्या सुंदर गावांबद्दल सांगायचं झालं तर....



सध्या मान्सूनचं आगमन देशासह महाराष्ट्रात झालंय, यामुळे विविध भागातील निसर्गसौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. अशात मुंज्या या चित्रपटातील दाखवल्या जाणाऱ्या सुंदर गावांबद्दल सांगायचं झालं तर ही गावं महाराष्ट्रातील कोकणातच आहेत. कोकणचा स्थानिक परिसर चित्रपटात दाखवण्यात आला आहे. कथेत मध्यभागी एक जंगल दाखवण्यात आले आहे. याच जंगलात एक झाड आहे, ज्यावर मुंजा नावाचे भूत राहते, असं यात दाखवण्यात आलंय. चित्रपटात दाखवलेले लोकेशन, ज्यात स्वच्छ वातावरण आणि हिरव्यागार झाडींनी वेढलेलं जंगल लोकांना खूप आकर्षित करत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना यात दाखवलेली गावं आणि ठिकाणं बघायची आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चित्रपटात पाहिलेल्या ठिकाणांबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.




'या' ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झालं


या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील कुडाळ तसेच चिपळुणातील गुहागर या ठिकाणी झाले आहे. हा परिसर हिरवाईने वेढलेला आहे, इथल्या निसर्गसौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर, स्वच्छ समुद्रकिनारे, खोल दऱ्या आणि धबधबे खरोखर पाहण्यासारखे आहे. यंदा पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे पावसामुळे हे ठिकाण आणखीनच सुंदर झाले आहे. राज्यात मान्सून सर्वप्रथम कोकणात दाखल झाल्याचे मानले जाते. यंदा मान्सून दोन दिवस आधीच कोकणात दाखल झाला होता. त्यामुळे तुम्ही जर मान्सून पिकनिकचा प्लॅन करत असाल तर, मुंबई आणि पुण्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी येथे भेट देणे हा सर्वोत्तम पर्याय असेल. तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत काही दिवस या ठिकाणी सहलीचे नियोजन करू शकता. आणखी एक सांगायचं झालं तर, कोकणच्या किनारी भागात जास्त पाऊस आहे, त्यामुळे सहलीचे नियोजन करताना योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, सोबत आवश्यक गोष्टीही सोबत ठेवा. महाराष्ट्रातील मित्रांसह भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे.


गुहागर - अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे 


मुंज्या चित्रपटात दाखवण्यात आलेला एक सुंदर बीच हा गुहागर समुद्रकिनारा आहे. गुहागर हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले एक पर्यटन स्थळ आहे. वेळ काढून कुटुंबासह येथे भेट द्या. या शहरात अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारे आहेत, पांढरी वाळू, मनमोहक दृश्ये आणि वृक्षाच्छादित झाडे ही गुहागर बीचची शान आहे. इथे आल्यावर कोकण संस्कृती पाहायला मिळते. गुहागर, वालुकामय समुद्रकिनारे आणि जलक्रीडा सुविधांनी युक्त, हे एक आदर्श सुट्टीचे ठिकाण आहे. हापूस आंबा, काजू यांसारख्या उष्णकटिबंधीय फळांसाठीही गुहागर ओळखले जाते.




कोकणात पाहण्यासारखी इतर ठिकाणे


काशीद, दापोली, दिवेआगर बीच, गणपतीपुळे, अलिबाग, हर्णै, रत्नागिरी आणि महाड या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.


चित्रपटात दाखवण्यात आलेला समुद्रकिनाराही कोकणातील असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात दिसणारे जंगलाचे दृश्यही कोकणातील असल्याचे बोलले जात आहे.


तुम्ही तुमच्या मित्रांसह येथे बाईक ट्रिपची योजना करू शकता. पावसाळ्यात ट्रेकिंग टाळावे. पण पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.


तुम्ही ट्रेनने येत असाल तर कणकवली रेल्वे स्टेशन पर्यंत तिकीट काढा. 


कोकण देशाच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे रस्त्याने तुम्ही येथे सहज पोहोचू शकता.


 


हेही वाचा>>>


Travel : ताणतणावातून व्हाल Relax, जेव्हा पावसाळ्यात कोकण फिराल, सावंतवाडीतील ही अप्रतिम ठिकाणं तुम्हाला वेड लावतील


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )