Travel : "भारत का बच्चा बच्चा..जय श्रीराम बोलेगा.." हे गाणं आपल्याला सर्वांनाच परिचयाचं आहे. याच प्रमाणे यंदाची रामनवमी (Ram Navami 2024) खास असणार आहे. यंदा 17 एप्रिल रोजी देशभरात श्रीरामाचा उत्सव म्हणजेच रामनवमी साजरी केली जाणार आहे. देशभर जय श्रीरामाचा नारा ऐकायला मिळणार आहे. या दिवशी अवघा देश राममय होताना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या रामनवमीला श्रीरामाचे निवासस्थान असलेल्या अयोध्येत लोकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशात प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी नवे नियम जारी केले आहेत. तसेच जर तुम्हीही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. कारण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मंदिराच्या प्रवेश आणि वेळेशी संबंधित सर्व माहिती सांगणार आहोत.


 


रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाचा जन्म


यंदा 17 एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, रामनवमी दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरी केली जाते. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाचा जन्म झाला. पौराणिक कथेनुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला आई कौशल्याने भगवान रामाला जन्म दिला. म्हणूनच हा दिवस प्रभू रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.


 


रामनवमीला भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार का?


रामनवमीच्या उत्सवानिमित्त अनेकजण अयोध्येतील श्रीरामाच्या ठिकाणी जाण्याचा बेत आखत आहे. रामनवमीला अयोध्येत येणाऱ्या भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. रामनवमीला अयोध्येला जाणाऱ्या लोकांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं सांगण्यात आलंय. तर या उत्सवा दरम्यान अयोध्येत दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तासन्तास रांगेत उभे राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शनासाठी जात असाल तर दर्शन घेत असताना बराच वेळ लागण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा.


 






 


रामनवमीला राम मंदिर किती दिवस खुले राहणार?


रामनवमीला राम मंदिराचे नियम-


सर्वसामान्यांना 24 तास दर्शनाची परवानगी असेल. 
लोकांची मोठी गर्दी होणार असल्याने मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. 
16,17,18 असे तीन दिवस राम मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जर तुम्ही राम मंदिरात दर्शनासाठी जात असाल तर काही वस्तू आवारात नेण्यावर निर्बंध आहेत. 
त्यामध्ये फोन, पाकीट, चार्जर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. तुम्ही पैसे घेऊ शकता.



पार्किंगची समस्या 


राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जवळपास 30 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण गर्दीचा विचार करून लोकल वाहतूकच निवडावी. अशा धार्मिक स्थळांवर विशेष प्रसंगी वाहने उभी करताना अनेक समस्या येतात, त्यामुळे अयोध्येला पोहोचल्यानंतर वाहन चालवणे टाळा.


 


प्रसादाची सुविधा


येथे प्रसादाची सुविधा मोफत असून जरी तुम्ही प्रसाद घेत असाल तरी तो अगोदरच जमा करून नंतर तो परमेश्वराला अर्पण केला जातो. येथे थेट प्रसाद देण्यास मनाई आहे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


Travel : 'कुछ तुफानी करेंगे!' एप्रिलमध्ये 'एडवेंचर ट्रीप' करायचीय? फक्त 'हे' पॅकेज बुक करा, मित्रांसोबत करा 'हँग आउट...