मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर दंड भरून तुम्हाला आयटीआर भरावा लागेल. दरम्यान नोकरदार वर्गाला आयटीआर भरण्यासाठी फॉर्म-16 ची गरज पडते. हा फॉर्म तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीकडून दिला जातो. कंपन्यांकडून जारी केल्या जाणाऱ्या या फॉर्ममध्ये तुमचे एकूण उत्पन्ना, तुम्ही देत असलेला कर इत्यादी माहिती असते. मात्र अनेकवेळा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना फॉर्म-16 देत नाहीत. अशा स्थितीत आयटीआर भरताना कर्मचाऱ्याची अडचण होऊन जाते.
तुम्ही नोकरी सोडली असेल तर अनेक कंपन्या फॉर्म-16 देत नाहीत. अनेकवेळा कॉल करूनही संबंधित कंपनीकडून हा फॉर्म देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तुम्हालाही अशा स्थितीचा सामना करावा लागत असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण TRACES नावाच्या संकेतस्थळावरून हा फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करता येतो. तो कसा करायचा, ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ या....
TRACES संकेतस्थळाची कशी मदत होणार?
TRACES ही प्राप्तिकर विभागाचे एक ऑनलाईन संकेतस्थळ आहे. तुम्हाला या संकेतस्थळावर फॉर्म 16/16ए/16बी/16सी/16डी/16ई/27डी डाऊनलोड करता येतात. वार्षिक कर क्रेडिट विवरण (फॉर्म 26एएस/वार्षिक कर विवरण) फॉर्मदेखील तुम्हाला येथे पाहायला मिळेल.
फॉर्म 16 असा करा डाऊनलोड
>>>>फॉर्म 16 डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अगोदर TRACES https://contents.tdscpc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
>>>> तुम्ही या संकेतस्थळावर अगोदरच रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्हाला फक्त लॉगीन करावे लागेल. त्यासाठी पॅन क्रमांक आणि पासवर्डची गरज आहे.
>>>> नव्या युजर्सना लॉगीन करण्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
>>>> एकदा लॉगीन केल्यावर डाऊनलोड सेक्शनमध्ये जा.
>>>> तिथे ‘फॉर्म 16’ हा पर्याय निवडा
>>>> त्यानंतर तुम्हाला फॉर्म 16 चा कोणता प्रकार डाऊनलोड करायचा आहो तो निवडा आणि आर्थिक वर्षाचीही निवड करा.
>>>> त्यानंतर आधार कार्डचा तपशील व्हेरिफाय करून घ्या.
>>>> त्यानंतर टीडीएस पावती क्रमांक आणि टीडीएस तारीख निवडा.
>>>> कपात केलेला आणि गोळा केलेला एकूण कर जोडा
>>>> त्यानंतर डाऊनलोड या ऑप्शनवर क्लीक करा
>>>> त्यानंतर तुम्ही फॉर्म 16 डाऊनलोड करून तो सेव्ह करू शकता.
हेही वाचा :
मोठी बातमी! केंद्र सरकार 'नॅनो खता'साठी देणार 50 टक्के अनुदान, अमित शाहांकडून योजनेला सुरुवात
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री