Monsoon Travel : बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी.. कोकणचं अप्रतिम निसर्गसौंदर्य.. आणि रेल्वेतून देशातील सर्वात सुंदर प्रवास..अनेकदा आपण चित्रपटांच्या माध्यामतून अशाप्रकारची सुंदर दृश्य पाहतो. तुम्ही कोकणातील 'या' धबधब्याखालून जाणारी रेल्वे पाहिलीय? पावसातील अप्रतिम दृष्य तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. कोकण रेल्वे प्रदेश हा देशातील सर्वात सुंदर रेल्वे प्रवासासाठी ओळखला जातो. अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला विविध दृश्य पाहायला मिळतात. यामध्ये एका ठिकाणी ट्रेन धबधब्याखाली जात असून प्रवासी आनंद घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेकडून सोशल मीडियावर अशा सुंदर पोस्ट शेअर केल्या जातात. त्यापैकी एक पोस्ट तुम्ही पाहिल्यानंतर वेड लावल्याशिवाय राहणार नाही...


 


निसर्गाचे सौंदर्य अगदी जवळून अनुभवू शकता..!


भारतीय रेल्वे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या सुंदर दृश्यांची छायाचित्रं शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये तुम्ही निसर्गाचे सौंदर्य अगदी जवळून अनुभवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत, जी जाणून तुम्हालाही सहलीला जावेसे वाटेल. दरम्यान, 2023 मध्ये हा व्हिडीओ रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. रेल्वेने शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, कोकणातील रत्नागिरीजवळील रणपत धबधब्यातून जाणाऱ्या ट्रेनचे सुंदर दृश्य पाहा, हे अतिशय रोमांचक दृश्य आहे. रेल्वे पुलावरून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुलावरून एक भव्य धबधबा वेगाने वाहत आहे. त्या धबधब्याचा आवाज इतका भव्य आहे की, तो ऐकून तुमच्या कानांना आराम मिळेल. विशेष म्हणजे त्या धबधब्याच्या अगदी खालून ट्रेन जात आहे.


 







कोकण रेल्वेच्या माध्यमातून सुंदर दृश्य पाहता येतात..!


भारतीय रेल्वेच्या मांडोवी एक्स्प्रेसमध्ये अनेक खास गोष्टी आहेत, ज्यामुळे ती इतर सर्व रेल्वेपेक्षा वेगळी समजली जाते. ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि गोव्याचे प्राथमिक रेल्वे स्थानक असलेल्या मडगाव जंक्शन दरम्यान धावते. ही ट्रेन 765 किलोमीटर अंतर कापते, ज्याचा प्रवास सरासरी 12 ते 14 तासांचा असतो. ट्रेनमधून बाहेर पडताना खूप सुंदर नजारेही दिसतात. या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हाला सुंदर पर्वत, नद्या, धबधबे इत्यादी पाहायला मिळतील. ही गाडी ठाणे, मडगाव आणि रत्नागिरीतून जाते. जिथे तुम्हाला एका अतिशय सुंदर धबधब्याला जवळून पाहण्याची संधी मिळते ज्यामुळे तुमचा प्रवास खूप आनंददायी होतो. मांडोवी एक्स्प्रेस मुंबईहून सकाळी सुटते आणि रात्री मडगावला पोहोचते. ही गाडी ठाणे, मडगाव आणि रत्नागिरीतून जाते.


 


कोकण रेल्वे का खास आहे?


कोकण रेल्वे हा देशातील एक रेल्वे मार्ग आहे, जो पश्चिम घाटात अरबी समुद्राला समांतर जातो. हा रेल्वे मार्ग फक्त कोकण रेल्वेने बांधला आणि चालवला. त्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान अनेक नद्या, पर्वत आणि अरबी समुद्र दिसतो. माहितीनुसार, या रेल्वे मार्गावर 2 हजार पूल आणि 92 बोगदे बांधण्यात आले आहेत.


 


 


हेही वाचा>>>


Travel : ताणतणावातून व्हाल Relax, जेव्हा पावसाळ्यात कोकण फिराल, सावंतवाडीतील ही अप्रतिम ठिकाणं तुम्हाला वेड लावतील


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )